हिंगोली (Isapur Dam) : जिल्ह्यातील इसापुर धरणात पाण्याची आवक पाहता २५ आँगस्ट सोमवारी दुपारी १२ वाजता (Isapur Dam) धरणाचे तीन दरवाजे ०.५० मीटरने उघडून ४९८८ क्युसेस अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.
इसापुर धरणात (Isapur Dam) सद्यस्थितीत पाणी पातळी ४४०.६८ मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ९३३ दलघमी आहे. धरणात पाणीसाठा ९६.८३ टक्के आहे. मागील सहा तासात ६ ते १२ वाजेदरम्यान पाण्याची आवक ३.३८९४ दलघमी आहे. धरणाचे तीन दरवाजे ० ५० मीटरने उचलून ४९८८ क्युसेक्स पाणी पेनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.
इसापुर धरणाच्या (Isapur Dam) लाभ क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू असल्याने धरणात होणारा अतिरिक्त पाणीसाठा पेनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. धरणात ९६.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.