परभणीतील कोतवाली पोलीसात गुन्हा!
परभणी (Gold Fraud) : स्वस्तात सोने देतो असे म्हणत हैद्राबाद येथील व्यक्तींना परभणीला बोलावण्यात आले. त्यांच्या जवळून 3 लाख रुपये घेत त्यांना सोने न देता फसवणूक करण्यात आली. सदरील व्यक्तींना स्वस्तातील सोन्याचे आमिष चांगलेच महागात पडले आहे. फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवार 24 जून रोजी रात्री कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. गुंड्डेगल्लु नरेंदर यांनी तक्रार दिली आहे. परमेश्वर पवार, जायफुल्या पवार या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला स्वस्तात सोने देतो, असे म्हणत संपर्क साधला. विश्वास बसावा म्हणुन सुरुवातीला काही खरे सोने देखील दिले. त्यानंतर फिर्यादी हे अधिकचे सोने घेण्यासाठी 24 जून रोजी दुपारी अडिचच्या सुमारास परभणीला आले. बसस्थानका जवळ त्यांनी 3 लाख रुपये आरोपींना दिले. संबंधितांनी पैसे घेत सोने दिले नाही. विश्वासघात करुन फसवणूक (Fraud) केल्या प्रकरणी कोतवाली पोलीसात (Kotwali Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि चव्हाण करत आहे.
बसस्थानकासमोर थरार!
मंगळवारी दुपारच्या सुमारास परभणी बसस्थानकासमोर एका इसमाला काही व्यक्ती गाडी मध्ये बळजबरीने बसवत होते. यावेळी संबंधित व्यक्ती आरडा-ओरड करत होता. नेमका हा प्रकार कशामुळे होत होता. हे कोणालाच समजले नाही. याच दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer) यांच्या पथकातील पोलीस अंमलदार शब्बीर पठाण, निळे सदर ठिकाणावरुन जात होते. यांनी संबंधित व्यक्तींना कोतवाली पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर बनावट सोन्याचा प्रकार पुढे आला.