दैनिक देशोन्नतीच्या वृत्ताची दखल!
परभणी (Aqueduct Work) : परभणीच्या पूर्णा शहरातील मोहन प्रेस जवळील चौकात मुख्य जलवाहिनीला गळती होऊन हजारो लिटर पाण्याची ११ ऑक्टोबर रोजी नासाडी झाली होती. याबाबतची बातमी दैनिक देशोन्नतीने १२ ऑक्टोबर च्या अंकात प्रसिध्द करताच न.प. प्रशासनाला जाग आली आणि तात्काळ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
नगर परिषदेला आली जाग!
नगर परिषदेला आली जाग!पूर्णा शहरातील मोहन प्रेस जवळील चौकात ११ ऑक्टोबर रोजी मुख्य जलवाहिनी फुटली. तसेच महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथेही अशीच परिस्थिती असल्याने वाया जाणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. याबाबत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहिती सुजान नागरिकांनी (Citizens) देशोन्नतीला दिली होती. त्यावरुन देशोन्नतीने वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेऊन न.प. प्रशासनाने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
नागरिकांत समाधानाचे वातावरण!
सदर बातमी सर्वच नागरिकांनी उचलून धरत प्रशासनावर (Administration) तोडगा काढण्यासाठी दबाव वाढल्याने बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी सदर जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे, तर पूर्णेतील सर्वसामान्य नागरिकांनी देशोन्नतीचे आभार व्यक्त केले आहेत.