नागपूर/नाशिक (Nagpur/ Nashik) :- पावसाळ्यामधील चिंताजनक बाब म्हणजे पाण्यामार्फत अनेक आजार पसरतात आिण वेळेवर त्यांचे निदान व उपचार करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचणे टाळता येऊ शकत नाही, तसेच सांडपाण्यामधून(sewage) बाहेर पडणाऱ्या दूिषत पाण्याच्या (Contaminated water) संपर्कात येण्याची शक्यता देखील असते. यामुळे पावसाळ्यादरम्यान सुरिक्षत राहण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. फक्त पाण्याने हात-पाय धुणे पुरेसे नाही. हात-पाय स्वच्छ धुण्यासाठी १५ भाग शुद्ध पाण्यामध्ये एक भाग सॅव्हलॉन Antiseptic Disinfectant Liquid मिसळले पािहजे. हा पावसाळ्यादरम्यान होऊ शकणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी सोपा उपाय आहे.
लेप्टोस्पायरोिससची माहिती:
सेंटर फॉर डीसीज कंट्रोल ॲण्ड प्रीव्हेन्शन (CDC) यांच्या मते, लेप्टोस्पायरोिसस (Leptospirosis) हा माती, पाणी व वनस्पती दूिषत करणारे प्राण्यांचे मूत्र आणि विष्ठेद्वारे प्रसारित होणारा जीवाणूजन्य संसर्ग आहे. या संसर्गासाठी कारणीभूत जीवाणूला लेप्टोस्पायरा म्हणतात. उंदीर, कुत्रे, घोडे, डुक्कर किंवा गायी या प्राण्यांमार्फत संसर्ग पसरू शकतो.
व्यक्तीला लेप्टोस्पायरोिसस आजार कसा होतो?
लेप्टोस्पायराची (Leptospira) लागण झालेल्या प्राण्यांमुळे पाणी किंवा माती दूिषत होते, ज्यामुळे जीवाणू इतर प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये पसरतात. व्यक्तीला पुढील माध्यमातून लेप्टोस्पायरोिसस होऊ शकतो :
लेप्टोस्पायराची लागण झालेल्या प्राण्याचे मूत्र किंवा इतर शारीिरक द्रवांशी प्रत्यक्ष संपर्क होणे. डोळे, तोंड, नाक, जखम झालेली त्वचा, श्र्लेष्मल त्वचा किंवा खुल्या जखमा यांचा प्रत्यक्ष दूिषत पाणी किंवा मातीशी संपर्क येणे. लेप्टोस्पायरोिससचा प्रादुर्भाव सांडपाण्यासारख्या दूिषत पाण्याच्या संपकार्त आल्याने होतो. पावसाळ्यात या प्रादुर्भावाची शक्यता वाढते, कारण ड्रेनेज लाइन गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचते, परिणामतः आजार होण्याचा धोका वाढतो. आजाराचा इन्क्यूबेशन कालावधी साधारणतः ५ ते १४ िदवसांचा असतो, जो २ ते ३०दिवसांचा देखील असू शकतो.
बारकाईने लक्ष ठेवावी अशी लक्षणे
लेप्टोस्पायरोिससची लक्षणे व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. लेप्टोस्पायरोिससची सामान्य लक्षणे आहेत ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, उलट्या होणे आिण पोटदुखी. डॉक्टरांनी सांिगतलेल्या अॅण्टीबायोिटक्ससह त्वरीत उपचार केल्याने या लक्षणांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते. पण सीडीसी लक्षणांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याचा सल्ला देते आिण त्यावर उपचार न केल्यास अंतगर्त रक्तस्त्राव अवयव िनकामी होऊ शकतात.
लेप्टोस्पायरोिससचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्यादरम्यान विशेषतः पाणी साचणाऱ्या भागांमध्ये लेप्टोस्पायरोिससला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संसर्गास प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी साचणाऱ्या भागांमध्ये न जाणे. शिफारस करण्यात आलेले काही उपाय पुढे देण्यात आले आहेत :
साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा. साचलेल्या पाण्यामध्ये जीवाणू मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे अशा ठिकाण जाणे टाळावे.
प्रतिबंधात्मक स्वच्छता सवयींचे पालन करा : घरी परतल्यानंतर संभाव्य जीवाणंूना दूर करण्यासाठी हात-पाय स्वच्छ धुवा. सांडपाणी िकंवा संभाव्य दूिषत पाण्याच्या संपर्कात आले असल्यास लेप्टोस्पायरोिससपासून सुरिक्षत राहण्यासाठी सॅव्हलॉन अॅण्टीसेिप्टक िडसइन्फेक्टण्ट लिक्विडचा वापर करा. दूिषत पाण्याच्या संपर्कात आलेल्या हाता-पायांचे लेप्टोस्पायरोिसस होण्यास कारणीभूत असलेल्या जीवाणूपासून ९९.९ टक्के संरक्षणासाठी १५ भाग शुद्ध पाण्यामध्ये एक भाग सॅव्हलॉन अॅण्टीसेिप्टक डिसइन्फेक्टण्ट लिक्विड मिसळा. (प्रयोगशाळा अभ्यासावर आधािरत).
प्रतिबंधात्मक स्वच्छता सवयी आिण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकर उपचार केल्यास पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोिससपासून संरक्षण होऊ शकते, कारण लक्षात ठेवा ‘स्वच्छता उत्तम तर आरोग्य देखील उत्तम’.