सालई खुर्द येथील प्रकार
नितीन लिल्हारे
सालई/खुर्द (Yashoda Company Fraud Case) : शेती चांगली पिकेल आणि उत्पादन जास्त मिळेल असा आशावाद शेतकर्यांमध्ये निर्माण होतो, कारण शेतकर्यांना शेती हेच वर्षभरासाठी उत्पन्न मिळवण्याचे एकमेव साधन असते, त्यामुळे यावर्षी बहुतेक शेतकर्यांनी पेरणीसाठी कृषि सेवा दुकानात जाऊन यशोदा कंपनीचे नोवा वाणाचे बियाणे खरेदी करून लागवड केली.
मात्र सदर कंपनीचे बियाणे कमी दिवसात धान ओंब्यावर आले असल्याने यात यशोदा बियाणे कंपनीने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. त्या (Yashoda Company Fraud Case) कंपनीचे बोगस बियाणे निघाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र बियाणे पूर्ण भेसळ निघाल्याची तक्रार यशोदा कंपनीकडे केली असून आर्थिक नुकसान भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शंकर गराडे, राजकुमार लिल्हारे, परसराम अटराहे, दुर्गाप्रसाद पटले, राजू लिल्हारे, राजन लिल्हारे, शिवदास दमाहे, झनकलाल दमाहे आदी शेतकरी करणार आहे.
शेतकरी शंकर गराडे, राजकुमार लिल्हारे, परसराम अटराहे यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे कृषि सेवा दुकानात विकत घेतली त्यावेळी दुकानदाराने सदर कंपनीचे बियाणे १४०-१४५ दिवसाचे सांगितले होते. मात्र सदर बियाणे ९५-११०-१२५-१४५ दिवसात धान ओंब्यावर आले असल्याने, हे बियाणे पूर्ण भेसळ निघाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित (Yashoda Company Fraud Case) शेतकर्याकडे पाण्याचे साधन असल्यामुळे ते नियमित भारी धानाची लागवड करीत होते.
परंतु यावर्षी यशोदा कंपनीचे नोवा वाणाचे धान घेतले व ते धानाचे वाण कमी दिवसात ओंब्यावर आल्याने शेतकर्यांच्या शेतातून पाण्याचा पूर वाहत असल्यामुळे शेतकर्यांपुढे धान कापणी करिता प्रश्न निर्माण झाला आहे. सदर धानाचे वाण हलके, भेसळ व पाण्यात असल्यामुळे त्यांचे धानाचे नुकसान होणार आहे, एवढे मात्र निश्चित. त्यामुळे शेतकर्यांना एकरी ५-६ बोरे उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी काढलेले कर्ज कसे काय परतफेड करावे? असा शेतकर्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे आता शेतकर्यापुढे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, तरी नामांकित बियाणे यशोदा कंपनीवर कारवाई करून लायसन्स रद्द करण्यात यावे, (Yashoda Company Fraud Case) शेतकर्यांचे धान पीक यशोदा कंपनीने किंवा शासनाने कापून न्यावं आणि शेतकर्यांना त्याचा मोबदला द्यावा, नाहीतर शेतकर्यांचे झालेल्या नुकसानाची आर्थिक नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.