Yawatmal :- जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणार्या पोलिसांच्या पोलीस ठाण्याचीच मोठी दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभर्यापासून पडक्या झोपडीसारख्या पडक्या शेडमध्ये वडगाव जंगल पोलीस ठाण्याचा (Police station)कारभार सुरु आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. एकूणच इमारत बांधकामाचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री संजय राठोड
पडक्या इमारतीत आजही पोलीस कर्मचारी समोरील शेडमध्ये बसतात. याच पडक्या शेडमध्ये तक्रारी नोंदविल्या जाते, असे विदारक चित्र आज घडील उमटून येत आहे. अशा आशयाचे वृत्त देशोन्नतीने २ जुलै २०२५ रोजी वृत्तपत्रात प्रकाशित करून शासनाला जाग आणुन दिली होती देशोन्नतीच्या(Deshonnati) वृत्ताची दखल शासनाने घेतली असून जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी पाच कोटी ३४ लक्ष ५३ हजार रू. निधीला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, लवकरच कामाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
पालकमंत्री राठोड यांनी नव्या इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले
वडगाव जंगल पोलीस ठाण्याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीची निर्मिती होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री (Guardian Minister) राठोड यांनी नव्या इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गृह विभागाच्या पोलीस व तुरूंग यांच्या आस्थापनांसाठी पायाभूत सुविधा पुरविणे या लेखाशीर्षाखाली ५ कोटी ३४ लक्ष ५३ हजार रू. निधीला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. हे काम गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण व्हावे. वडगाव जंगल पोलीस ठाण्यासाठी सुस्थित इमारत असणे आवश्यक होते. निधीला मान्यता मिळाल्याने ठाण्यासाठी एक चांगली इमारत निर्माण होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात उत्तमोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री . राठोड यांनी दिली आहे.




 
			

