Yawatmal :- जिल्ह्यातील १० नगरपरिषदा पालिकांची निवडणूक (Election) प्रक्रिया राबविण्यासाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा, सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हे प्रारूप आराखडे प्रसिद्ध केले जाणार आहेत. उद्या प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर लगेचच हरकती व सूचना दाखल करता येणार असून, त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
३१ ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना करता येणार दाखल
प्रारूप प्रभागरचनेत जिल्ह्यातील १० नगर परिषदेमधील प्रभागांमध्ये नव्याने प्रभाग वाढले आहे. यवतमाळ नगर परिषद मध्ये पुर्वी २८ प्रभाग होते आता तिथे १ प्रभाग नव्याने वाढले आहे.आर्णी येथे ९ प्रभाग होते तर तिथे २ प्रभाग वाढले आहेत. पाढरकवडा येथे जुने ९ प्रभाग होते तर तिथे २ प्रभाग नव्याने तयार झाले आहे. घाटंजी नगर परिषदेत पहिले ८ प्रभाग होते तर आता २ प्रभाग वाढले आहेत. दारव्हा नगर परिषदेत (City Council) पहिले १० प्रभाग होते तर आता १ प्रभागाची वाढ झाली आहे. दिग्रस नगर परिषदेमध्ये जुने १० प्रभाग होते तर आता १ प्रभाग नव्याने तयार झाला आहे. उमरखेड नगर परिषदेत पुर्वी १२ प्रभाग होते तर आता १ प्रभाग नव्याने तयार झाला आहे .नेर नगर परिषदेत पहिले ९ प्रभाग होते तर आता १ प्रभाग नव्याने वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील नगर सेवकांच्या संख्येत वाढ होणार असून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी नंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
२२ ऑगस्ट रोजी होणार जि.प प.सच्या अंतिम गट गणांची प्रसिद्धी
यवतमाळ जिल्ह्यातील गट व गणांच्यां अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे पहिले ही प्रसिद्धी १८ ऑगस्ट रोजी होणार होती मात्र आता २२ ऑगस्ट रोजी गटगणांच्या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी होणार आहे.