Manora :- शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त (retired) झाल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी खर्च करावे, असे आवाहन ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केले.
गुणांवर प्रकाश टाकून त्यांच्या पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या
स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयातील एम सी व्हि सी विभागाचे (MCVC Division) कर्मचारी गणेश भोयर हे दिनांक 31 ऑगस्टला नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले, त्यांच्या कृतज्ञता सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून अरविंद पाटील इंगोले हे बोलत होते. शैक्षणिक कार्यात कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व महाविद्यालयाच्या नाव लौकिकासाठी जे कार्य केले याचा उल्लेख सुद्धा अध्यक्षीय मनोगत मधून अरविंद पाटील इंगोले यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे, संस्थेचे संचालक ज्ञानदेवराव भोयर, महाविद्यालयाचे (colleges) प्राचार्य डॉ. एन एस ठाकरे, सेवानिवृत्त कर्मचारी प्रा. भगत, प्रा.बोके सर, प्रा. हेमंत चव्हाण, प्रभाकर भोयर, आनंद पाटील आदी मान्यवर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे यांनी सुद्धा प्रा गणेश भोयर यांच्या 33 वर्षातील शैक्षणिक कार्यावर आपल्या मनोगत असून प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी गणेश भोयर यांच्या काम करण्याच्या पद्धती, कामातील प्रामाणिकपणा व सचोटी इत्यादी गुणांवर प्रकाश टाकून त्यांच्या पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. महाविद्यालयातील प्रा. राऊत, शिक्षकेतर कर्मचारी सुनील पडघान, एमसीवीसी विभागाचे दर्यापूरकर यांनी कृतज्ञता सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले. कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संयोजक डॉ.ए.वाय.अली यांनी केले, प्रास्ताविक प्रा. कु. स्नेहल ढवळे तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील काळे यांनी केले.