परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 9 गुन्ह्याची उकल!
परभणी (Motorcycle Theft) : परभणी शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारे टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतली आहे. चोरट्यांजवळून 10 मोटरसायकली जप्त करण्यात आले असून, एकूण 9 गुन्ह्याचे उकल झाली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला दुचाकी चोरांच्या शोध लावण्याचे आदेश!
परभणी जिल्हासह दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला दुचाकी चोरांच्या शोध लावण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुण्यातील आरोपींच्या (Accused) शोध सुरू केला. गुप्त माहितीवरून अरुण उत्तम कांबळे याला ताब्यात घेतले. त्याने साथीदारासोबत मिळून दुचाकी चोरला समोर आले आहे. पोलिसांनी सापळा रचत मोहन शामराव नवघरे ओंकार शिवाजीराव तिथे मल्हारी उर्फ हरी लक्ष्मण कसबे नागेश रामदास तुरे यांना ताब्यात घेतले. संबंधितांनी नानलपेट नवा मोंढा ताडकळस चुळावा आदी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्या होत्या. संबंधित जवळून 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे पोलीस (Parbhani Police) निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मृत्यपड, पोलीस अमलदार मधुकर चट्टे, सुग्रीय केंद्र निलेश भुजबळ, विलास सातपुते, रवी जाधव, सूर्यकांत फड, लक्ष्मण कांगणे, निलेश परसोडे, शेख रफीयोदिन, परसराम गायकवाड, दीपक मोदीराज, धुकर ढवळे, उमेश चव्हाण, रंजीत आगळे, सायबर सेलचे गणेश कोटकर व सय्यद उमर या पथकाने केली.




 
			 
		

