देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagar Parishad Teachers: नागपूर विभागातील नगर परिषदेच्या ९७४ शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Nagar Parishad Teachers: नागपूर विभागातील नगर परिषदेच्या ९७४ शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले
विदर्भअमरावती

Nagar Parishad Teachers: नागपूर विभागातील नगर परिषदेच्या ९७४ शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/17 at 1:37 PM
By Deshonnati Digital Published July 17, 2025
Share
Nagar Parishad Teachers

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे औदासिन्य

अमरावती () : नागपूर विभागातील मनपा सह नगरपालिकांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांचे (Nagar Parishad Teachers) तीन महिन्यापासून रखडलेले वेतन तातडीने अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी गुरुवारी (ता. १७ जुलै) दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या (३५८), चंद्रपूर महानगर पालिकेच्या (५५) , कामठी कटक मंडळाच्या (०७) आणि नागपूर विभागातील अन्य नगरपालिकांच्या (५५४) प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल, मे व जून महिन्याचे वेतन जुलै महिना संपत आलेला असताना सुद्धा झालेले नाही.

सारांश
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे औदासिन्यमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारातीन महिन्यांपासन वेतन न झालेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्हा निहाय संख्या

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

नागपूर विभागातील नगरपालिकांच्या प्राथमिक शिक्षकांचे Nagar Parishad Teachers एप्रिल व मे महिन्याचे वेतन झाले नसल्याने शीघ्र कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १९ जून रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक आणि नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना कळविले होते. त्याचप्रमाणे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांना येथे वर्धा येथे २१ जून रोजी निवेदन दिले होते. त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना तातडीने वेतन करण्याबाबत निर्देश दिले. परंतु एप्रिल व मे महिन्याच्या वेतनाबाबत कोणतीच कार्यवाही अद्यापही झालेली नाही. जून महिन्याचे वेतन सुद्धा जुलै संपत आलेला असताना सुद्धा झालेले नाही.

तब्बल तीन-तीन महिने शिक्षकांचे वेतन न होणे ही बाब प्रशासनिक अनास्था, औदासिन्य आणि बेजबाबदारपणाचच आहे. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित आस्थापनेने याप्रकरणी पूर्णतः असंवेदनशीलता चालवली आहे. संबंधित शिक्षकांची कोणतीही चूक नसताना तब्बल तीन महिने शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे ही क्रूर चेष्टा आहे.

महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीने (Nagar Parishad Teachers) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त, राज्याच्या शिक्षण विभागाचे उपसचिव, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना १७ जुलै रोजी निवेदन पाठवून नागपूर विभागातील महानगरपालिका व नगरपालिका अधिनस्त प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन तातडीने न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तीन महिन्यांपासन वेतन न झालेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्हा निहाय संख्या

नागपूर महानगरपालिका (३५८), चंद्रपूर महानगरपालिका (५५), कामठी छावणी कटक मंडळ (०७), गोंदिया जिल्हा (४८), वर्धा जिल्हा (८३), नागपूर जिल्हा (२८४), भंडारा जिल्हा (३४), चंद्रपूर जिल्हा (३६), गडचिरोली जिल्हा (६९)…

प्रशासनिक अनास्था व औदासिन्यामुळे तब्बल तीन महिने नागपूर विभागातील मनपा व (Nagar Parishad Teachers) नपाच्या शाळांतील ९७४ प्राथमिक (Nagar Parishad Teachers) शिक्षक दरमहा वेतनापासून वंचित आहेत. यापूर्वी विनंती करूनही प्रशासनिक यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष अमानवीय व असंविदेनशीलतेचे दुर्दैवी द्योतक आहे. तब्बल तीन महिने वेतनापासून वंचित असणाऱ्या शिक्षकांच्या अडचणींचा प्रशासनिक यंत्रणेच्या अंमलबजावणी स्तरावर कुठेही विचार केला जात नाही हे निषेधार्ह आहे.
– विजय कोंबे. राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

You Might Also Like

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

TAGGED: Nagar Parishad Teachers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Yawatmal Reymond Compony : रेमंड कंपनीत कर्मचार्‍यांचे आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital July 22, 2025
Washington: स्टारलिंक आणि इतर उपग्रहांमुळे, ओझोन थर धोक्यात?
Gadchiroli : ‘सूर्यघर’ योजनेकडे जिल्ह्यातील नागरीकांनी फिरविली पाठ
Parbhani Murder: मारहाणीत तरुणाचा मृत्यू; वर्षभराने खूनाचा गुन्हा दाखल
Hingoli Pickup vehicle: हिंगोलीत राशनच्या संशयावरून तांदळासह पिकअप वाहन पकडले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Minor Irrigation Department
विदर्भवाशिम

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?