निवडणूक एकत्रित लढवणार
आखाडा बाळापूर (Mahavikas Aghadi) : येथील बाजार समिती १८ संचालक मंडळासाठी निवडणूक (Bazar Samiti Election) प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.३० रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील या महत्त्वाच्या सहकार क्षेत्रातील सत्ता केंद्रावर वर्चस्व दाखवून देण्यासाठी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी एकजूट झाली असुन बाजार समीती निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला.
माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने यांच्या आराटी येथील फार्महाउसवर माजी खा. शिवाजीराव माने,माजी आ.डॉ. संतोष टारफे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, मनीष आखरे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत,जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,माजी जि.प.उपाध्यक्ष डी.के.दुर्गे, उपजिल्हा संघटक सोपान बोंढारे,कॉग्रेस नेते उपसरपंच मोहम्मद जिया कुरैशी, बालाजी पाटील बोंढारे, तालुका प्रमुख सखाराम उबाळे,बाजार समिती सभापती मारोतराव खांडेकर, माजी सभापती नागोराव करंडे, गजानन काळे, चंद्रकांत देशमुख, बाळासाहेब गावंडे, गणाजी बेले,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अवधूत निळकंठे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संतोष बोंढारे, माजी युवक तालुका अध्यक्ष अभिजित देशमुख, युवक तालुका अध्यक्ष सुशील बोंढारे,ऑड. रवी शिंदे,डॉ. अरूण सुर्यवंशी, माजी जि.प.सदस्य भगवान खंदारे, माजी उपसरपंच दयानंद पतंगे,शिवचरण गोयंका, गुलाब भोयर, रूपेश सुर्यवंशी, सुनील सावंत, संतोष राजेगोरे,बाबुराव वाघमारे, दत्तराव वाघमारे, अमोल काळे,सह महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अस शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत यांनी सांगितले.
महाविकास आघाडी एकत्रितपणे घेणार निर्णय
बाजार समितीच्या निवडणूकीत (Bazar Samiti Election) कोण कोणत्या जागा लढवायच्या,कोण उमेदवार द्यावा हे (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी नेते पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेणार आहे अस आजच्या बैठकीत ठरले. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास राजकीय ‘बळ’ मोठे आहे.यामुळे महाविकास आघाडी निवडणूक हालचाली कडे लक्ष वेधले गेले आहे.