आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये!
औंढा नागनाथ (Aadivasi Samaj Morcha) : आदिवासी समाजाच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये या मागणी करिता मंगळवार दिनांक सात आक्टोंबर रोजी , बारा वाजता औंढा तहसीलवर आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव महामोर्चा काढला. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथून निघालेला हा महामोर्चा औंढा तहसील कार्यालयावर काढला.
आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी!
आदिवासी समाजाची रिक्त १२ हजार ५२० पदे आदिवासी जात वैधता धारकामधुन भरावीत, सरळ सेवा भरतीने अनुसूचित जमातीची ८५ हजार रिक्त पदे जात वैधता प्रमाणपत्राशिवाय भरू नयेत, सशर्थ जात वैधता प्रमाणपत्र देणे बंद करावेत, छोट्या संवर्गातील बिंदू नामावली पूर्ववत ठेवावी, औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव येथे आदिवासी मुलामुली करिता नवीन आदिवासी विभागाचे वस्तीगृह मंजूर करावे, हिंगोली जिल्ह्यातील वन जमीन अधिनियम २००६ व गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण कायम करून सातबारा नावाने करण्यात यावा, १ जुलै २०१६ रोजी मराठवाड्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची विशेष तपासणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली छ.संभाजीनगर यांनी केलेली असून त्या अहवालाची अंमलबजावणी करून दोषीवर गुन्हे दाखल करावेत , संगीता चव्हाण यांच्या कार्यकाळातील अनुसूचित जमातीचे (Scheduled Tribes) देण्यात आलेले जात वैधता प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यात यावी, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या सिंचन विहिरीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, हिंगोली जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी ज्यांची जात वैधता झालेली नाही, त्यांची नौकरी सहा महिन्यापेक्षा जास्त झालेली आहे ,अशा कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात यावी , आदिवासी विकास विभागाचा निधी इतर विभागाला वर्ग करण्यात येऊ नये , इतर विभागाला वर्ग केलेला निधी तात्काळ आदिवासी विकास विभागाला वर्ग करावा , आदिवासी वस्तीगृहाची क्षमता वाढून विद्यार्थी संख्या वाढविण्यात यावी , हिंगोली जिल्ह्यात एकलव्य आदिवासी निवासी इंग्लीश स्कुल मंजूर करण्यात यावे, हिंगोली जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरीवनुकसान भरपाई देण्यात यावी, अनुसूचित जमाती पदांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती व आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावेत, अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत आहे ते कार्यालय हिंगोली आणि किनवट येथे स्थलांतरित करावे , आदिवासी बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींना शबरी विकास महामंडळ मार्फत पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, डोंगरी गावाचे सर्वेक्षण करून तात्काळ आदिवासींची सर्व गावे डोंगरी योजनेमध्ये समावेश करण्यात यावीत आदि मागण्यांसाठी औंढा तहसिल कार्यालयावर (Tehsil Office) मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी महामानवाला अभिवादन करून आदिवासी समाजाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले यावेळी या महामोर्चात मा.आमदार डॉ संतोष टारफे , डॉ. सतीश पाचपुते, सुदामराव खोकले, पांडुरंग मेटकर, भला कोकाटे,शंकर शेळके,मारोती बेले,सुरेश पवार अशोक दळवे शैलेश रिठे सोनू मुकाडे अनिल पोटे,संतोष टारफे, धनंजय ढाकरे यांच्यासह आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .महामोर्चा झाल्यानंतर नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देण्यात आले. या दरम्यान पोलीस निरीक्षक जीएस राहीरे पोलीस उपनिरीक्षक शेख कुदुस दत्ता कानगुले, अफसर पठाण, जमादार वसीम पठाण, रविकांत हारकाळ , दिलीप नाईक, सुभाष जायतडे, यांनी बंदोबस्त ठेवला होता.