औसा नाथमंदिर विठ्ठल दर्शन

औसा नाथमंदिरात विठ्ठल दर्शनासाठी तोबा गर्दी!

Nathmandir Vitthal Darshan: औसा शहरातील नाथ मंदिरामध्ये आषाढी एकादशीला सूर्यवंशी जतिने भरलेल्या वेळोवेळी होणाऱ्या विठ्ठल दर्शनासाठीचे महाप्रसाद दानकार योजनेत महत्त्वपूर्ण उत्सव

औसा नाथमंदिरात विठ्ठल दर्शनासाठी तोबा गर्दी!

Nathmandir Vitthal Darshan

 

आषाढी निमित्त औसा शहराला प्रति पंढरपूरचे स्वरूप

औसा (Nathmandir Vitthal Darshan) : आषाढी अर्थात देवशयनी एकादशीच्या परम पवित्र दिवशी औसा येथील नाथमंदिरात स्वयंभू श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी शनिवारी अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक गाठला. पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.  पहाटे 5 वाजता श्री मच्छिंद्रनाथ मल्लिनाथ महाराज यांनी नाथ मंदिरातील स्वयंभू विठ्ठलाची ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात शोडशोपचारे महापूजा आरती केली. वे.शा.स. श्री पुरुषोत्तमाचार्य जोशी निटुरकर, श्री बालाजी देव यांच्या वेदमंत्र घोषात विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. यानंतर महाआरती करून सर्वांना दूध केळी प्रसाद स्वरूपात देण्यात आली. महापूजा आरतीस सर्वश्री सुरेशअप्पा ठेसे प्रा. गुरुलिंग औटी, माशाळे, पत्रकार रोहित हंचाटे, महेश अपसिंगेकर, कंकाल, पत्रकार विजय बोरफळे, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, गुंडानाथ सूर्यवंशी, रामपुरे, जाधव, बालाजी पाटील, विजय चौहान, धनंजय वैजवाडे, कोपरेआप्पा, शामभाऊ कुलकर्णी, माळी गुरुजी, गणेश कटके उपस्थित होते.

वारकरी भाविकांची (Nathmandir Vitthal Darshan) नाथ मंदिरातील विठ्ठल दर्शनासाठी भली मोठी दुहेरी लाईन लागलेली असताना गावोगावीच्या दिंड्या नाथ संस्थानात येण्यास आरंभ झाला. या सर्व दिंड्यातील वारकरी विणेकरी, झेंडेकरी, तुळस माय यांच्या सहभागात ह शभप श्री श्रीरंग गहिनीनाथ महाराज यांच्या अधिपत्यात नाथ मंदिरापासून औसा शहरातील नेहमीच्या प्रदक्षिणा मार्गाने भव्य स्वरूपात विठ्ठल नाम आणि सद्गुरु वीरनाथ मल्लनाथाच्या जयघोषात उस्फूर्त अशी दिंडी काढण्यात आली.

दर्शनार्थी दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री वैजू आप्पा ईळेकर आणि त्यांच्या सर्व प्रतिष्ठानच्या सेवाधरी सदस्यांनी आयोजित केलेल्या फराळ प्रसादाचा लाभ घेतला. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या दर्शनासाठीची फराळ महाप्रसाद रांग दुपारी चार पाच वाजेपर्यंत मोठ्या संख्येत सुरुच होती.

प्रति पंढरपूर ते स्वरूप...
दरवर्षी मंदिरातील विठ्ठल दर्शनासाठी आणि महाप्रसाद लाभ घेण्यासाठी दिवसेंदिवस वारकरी भाविकांची गर्दी वाढत असून आषाढी एकादशीस औसा शहर प्रति पंढरपूर झालेले दिसून येत आहे. (Nathmandir Vitthal Darshan) वारकऱ्यांची नाथ संस्थान गुरुगादीवर नाथ मंदिरातील स्वयंभू विठ्ठलावर अपार श्रद्धा असल्याचेच हे द्योतक आहे.

संबंधित सामग्री

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Sep 26, 2026
महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे.

Sep 03, 2026
भंडारा-महाप्रसादासाठी आता परवाना बंधनकारक; विनानोंदणी आयोजन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

भंडारा-महाप्रसादासाठी आता परवाना बंधनकारक; विनानोंदणी आयोजन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

राज्यात धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा व महाप्रसादासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी किंवा परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

Aug 24, 2026
​बेराळा येथे २५० वर्षांची परंपरा उत्साहात; श्री मुक्ताई पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

​बेराळा येथे २५० वर्षांची परंपरा उत्साहात; श्री मुक्ताई पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Shri Muktai Palkhi : मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी आणि पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागलेली संत आदिशक्ती श्री मुक्ताई यांची पालखी दिंडी चिखली तालुक्यातील बेराळा येथे दाखल

Aug 12, 2026
गोकर्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी

गोकर्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी

Ashadhi Ekadashi: जिल्ह्यातील हजारो भाविक दाखल झाल्याने गोकर्णेश्वर माळरान परिसरात भाविकांचा मोठा जनसागर ऊसळला होता जणू काही अवतरली भाविकाची पंढरी

Jul 25, 2026