गडचिरोली (Gadchiroli):- वडसा तालुक्यातील कसारी फाट्या जवळ कुरखेडा कडे भाजी पाला घेऊन येणाऱ्या पिक वाहनाने दुचाकी ला धडक (strike) दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू (death) झाल्याची घटना सकाळी ११.३०वाजता घडली. धडक देऊन पिकअप चालक वाहनासह पसार झाला. मृत दुचाकी चालक बोळधा येथील रहिवासी असल्याचे कळते.
बोळधा येथिल कैलाश मधुकर नाकाडे वय वर्षे अंदाजे 45 हा युवक स्वतः च्या दुचाकी वाहनाला कुरखेडा तालुक्यातील पुराडा ईथुन स्वगावी येत असतांना वडसा रोडवरील कसारी मठा शेजारी दुपारी अंदाजे 12वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कैलासचा जागिच मृत्यू झाला. काही नाघरीकांना कैलास पडला असल्याचे निदर्शनास येताच बघीतले असता कैलास च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मृत्यू झाले असल्याचे लक्षात आले असता घटनाच माहीती पोलीसांना देण्यात आली. नेमका अपघात घडला कसा हे अजपर्यंत कळले नसून अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाल्याचा कयास बांधला गेला. घटनेचा देसाईगंज पोलिस अधिक तपास करीत आहे.