कन्हान (Accidental Youth Death) : नागपुर जबलपुर रस्त्यावरील टेकाडी बस स्टाप सामोरील ओव्हर ब्रिज च्या आत मधिल रोडवर कोळसाचे चौदा चाकी पेक्षा जास्त चाकीचे ट्रक रांगेत कुठलेही इनडिग्रेटर न लावता दिवस रात्र उभे राहत असल्याने चारपदरी रोड अरूंद होऊन दुचाकी, चार चाकी वाहन चालकाना अचानक ट्रक दिसत असल्या ने त्यांचे वाहन त्यावर आदळुन झालेल्या (Accidental Youth Death) अपघातात एका युवकाचा घटना स्थळीच मुत्यु झाला. कुणाल गुणवंत खेरडे वय २४ वर्ष रा. गोंडेगाव असे मुतककांचे नाव आहे.
फिर्यादी प्रणय ईश्वर खवले, वय ३१ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१ गोंडेगाव ता. पारशिवनी जि. नागपुर याचा मावस भाऊ कृणाल गुणवंत खेरडे, वय २४ वर्ष, त्याची आई लता खेरडे व वडील गुणवंत खेरडे हे त्यांचे घराजवळ राहत असुन मजुरीचे काम करत होता. प्रणय आपल्या घरी झोपला असता मंगळवार (दि.१६) च्या मध्यरात्री म्हणजे बुधवार (दि.१७) सप्टें ला रात्री २ वाजता ओळखीचे सुर्यभानजी फरकाडे यांनी फोन करून सांगितले की, टेकाडी ब्रीज जवळ एक अपघात झाला व एक ईसम मरन पावला असे म्हणुन माझे व्हाट्सअप नंबर वर अपघात झालेला इसमाचे फोटो पाठवले असता त्याने फोटो पाहिला तर तो त्याचा मावस भाउ कुणाल खेरडे असल्याने लगेच घटनास्थळी जाऊन पाहिले तर तेथे मावस भावाची बजाज पल्सर दुचाकी क्र. एमएच ५० झेड – २९७० ही अपधात स्थितीत रोड चे बाजुला ठेवली होती.
रोडवर रक्त सांडलेले होते. माहिती घेतली तर एका ईसमाने सांगितले की, (दि.१६) सप्टे. रात्री ११.३० ते १२ वाजता दरम्यान कुणाल खेरडे हा पल्सर दुचाकीने कन्हान कडुन टेकाडी ओव्हर ब्रिज चे खालुन येत असता यशवंत सेलीब्रेशनचे समोर रोडवर एक अज्ञात ट्रक चालकाने त्याचे ट्रक पार्कींग लाईट न चालु ठेवता रस्त्यावर अंधारात उभे ठेवल्याने कुणाल खेरडे ची दुचाकी ट्रक ला मागुन घडक लागुन तो जागीच पडला. त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने तो घटनास्थळीच मरन पावला, पोलीसांनी पंचनामा कार्यवाही करून त्याचे मृतदेह कामठी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरिय तपासणी करिता घेवुन गेले आहे.
यावरून प्रणय ने सकाळी सरकारी दवाखाना कामठी येथे शवविच्छेदन गृहात जाउन पाहिले तर त्याचा मावस भाउ कुणाल खेरडे चे मृतदेह शवविच्छेदन गृहात फ्रिजर मध्ये ठेवले होते. यामुळे फिर्यादी प्रणय ईश्वर खवले, वय ३१ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१ गोंडेगाव यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान थानेदार वैजयंती मंडवाधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.