बार्शीटाकळी (Barshitakali Crime) : बार्शीटाकळी पोलिसांनी इंदिराआवास दोन तलवारी सह एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बार्शीटाकळीतील इंदिरा आवास परिसरात एक इसम 2 धारदार तलवार जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, (Barshitakali Crime) बार्शी टाकळीचे पीएसआय सुहास गोसावी,फराज शेख, पो हे कॉ. राजेश जोंधाळकर , पो. शि. अमोल हाके, पो शि सुम्मैया मोहम्मद यांनी छापा मारला असता आरोपी रईस खान रफिक खान वय 50 वर्षे याचे ताब्यात 2 धारदार तलवार मिळून आल्यानंतर दोन तलवारी जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई (Barshitakali Crime) जिल्हा पोलीस अधीक्ष अर्चीत चांडक यांनी अवैध धंद्याविरुद्ध चालू केलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली आहे. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक व बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ पो स्टे बार्शीटाकळी यांचे मार्गदर्शनात पो स्टे बार्शी टाकळी येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.