जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही.लोखंडी यांनी सुनावला निकाल
हिंगोली (Minor girl murder case) : तालुक्यातील नांदूसा येथील एका अल्पवयीन मुलीचा ब्लेडने गळा कापून खून केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपये दंड सुनावला आहे.
याबाबत अॅड.सविता एस. देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, नांदूसा येथे २१ मे २०२० रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास शेतात काडी कचरा जाळण्याकरीता काडीपेटी पाठविण्या बाबत शेजारी राहणारा बालाजी उर्फ गोपाल आडे याला फिर्यादीने फोन करून त्यांच्या मुलासोबत माचीस घेऊन पाठविण्या बाबत आडे यांना सांगितले. त्यावेळी फिर्यादीची मोठी मुलगी व पत्नी हे दोघे शेतात उपस्थित होते. आडे याने फिर्यादीच्या मोठ्या मुलाला काडीपेटी देऊन शेतात पाठविले. मोठ्या मुलाने शेतात काही वेळ काम केल्यानंतर ११ वर्षीय मुलगी व एक मुलगा घरी आले. यावेळी आरोपी बालाजी उर्फ गोपाल याने त्या मुलास मोबाईलवर पब्जी गेम लावून बालाजीच्या शेतात बसविले तो मुलीच्या घरी गेला.
यानंतर त्याने ११ वर्षीय मुलीचा ब्लेडने गळा कापून खून केला. काही वेळानंतर सदर कुटुंबातील दुसरा मुलगा दुपारी १२ वाजता घरी आला. त्याला त्याची अल्पवयीन बहीण रक्तबंबाळ अवस्थेत दिसून येताच मुलाने शेतात धाव घेऊन आई वडीलाना या घटनेची माहिती दिली. हे सर्वजण घरी धावून आले असता फिर्यादीची मुलगी रक्त बंबाळ अवस्थेत व तिच्या बाजूला रक्ताने भरलेली ब्लेड दिसून आली. यावेळी फिर्यादीने तिला हातावर उचलून घराबाहेर आणले असता तिचा गळा कापलेला व कपडे रक्ताने भरलेले दिसून आले तसेच तिचा मृत्यू झाल्याचे कळून चुकले. त्यामुळे फिर्यादीने मुलास काय झाले याबाबत विचारणा केली असता बालाजी उर्फ गोपाल आडे याने मुलाला मोबाईलमध्ये पब्जी नावाचा गेम लावून आडे यांच्या शेतातील पिंपळाच्या झाडाखाली बसून पब्जी गेममध्ये गुंतवूण आडे हा फिर्यादीच्या घराकडे आला होता असे मुलाने सांगितले.
या प्रकरणात बासंबा पोलीस ठाण्यात बालाजी उर्फ गोपाल आडे याच्यावर खुनासह बाललैगींक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनी केला. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. लोखंडे यांच्या समोर चालले. ज्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील सविता यश देशमुख यांनी एकूण १७ साक्षीदार तपासून अंतीम युक्तीवाद केला. ज्यामध्ये न्यायालयात फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. ७ डिसेंबर रोजी अंतीम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. लोखंडे यांनी आरोपी बालाजी आडे याला कलम ३०२ भादंवि अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपयाचा दंड सुनावला. ही दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेस पारीत केले. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्पेâ श्रीमती सविता एस. कुटे यांनी बाजू मांडली तर त्यांना एस.डी. कुटे, एस.एन.मुटकुळे सरकारी वकील यांनी सहकार्य केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.टी.डोईजड कोर्ट पैरवी यांनीही सहकार्य केले.
प्रेम प्रकरणामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ब्लेडने गळा कापून खून केला होता. या प्रकरणात बासंबा पोलिसात २१ मे २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी विधीज्ञांनी मांडली भक्कम बाजू
अल्पवयीन मुलीचा ब्लेडने गळा कापून खून केल्याने बालाजी उर्फ गोपाल आडे याच्यावर बासंबा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी एकूण १७ साक्षीदार तपासून अंतीम युक्तीवाद केला. साक्षी पुराव्यात फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली व आरोपीच्या हातावरील ब्लेडच्या जखमा, आरोपीला तपासणारे डॉक्टर व सर्वात शेवटी पाहणारा साक्षीदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.