रिसोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून अभिनंदनास्पद कामगिरी केली!
रिसोड (Accused Jail) : रिसोड 14 जून 2025 रोजी रात्री हिंगोली पोलिसांकडून माहिती मिळाली की, 3 दिवसापूर्वी हिंगोली येथे पडलेल्या दरोड्यातील आरोपी रिसोड येथे लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी 2 टीम नेमून सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु केले व काही तासातच मुख्य आरोपी-ज्ञानेश्वर खानझोडे व परमेश्वर चौधरी सह इतर एकूण 7 संशयितांना रिसोड येथून दरोड्यातील चोरी गेलेल्या 5 ते 6 लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांच्या (Hingoli Police) ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीतांनी फ्लिपकार्ड कंपनीचे (Flipcard Company) मालाने भरलेले मोठे वाहन जबरीने पळवून अज्ञात स्थळी नेऊन त्यातील साडे 8 लाखाचा माल दुसऱ्या वाहनात पलटी करून चोरी केला होता. आरोपी शातीर असल्यामुळे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच रिसोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून अभिनंदनास्पद कामगिरी केली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल (Assistant Superintendent of Police Navdeep Agarwal) सर यांचे मार्गदर्शनात रिसोडचे ठाणेदार-रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक- रामेश्वर नागरे पोलीस हवालदार मालवे, रंजवे, पोलीस कॉन्स्टेबल- सुशील इंगळे, विनोद घनवट, रवी अडागळे परमेश्वर भोणे, अनिल राठोड, सुधाकर सोन्नर , संतोष अवगळे, प्रवीण गोपनारायण, रवी इरतकर यांनी केली आहे.