वाडेगाव (Blackbuck Hunting) : येथील एका घरात वन्य प्राणी काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची वाटणी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून २४ फेब्रुवारी रोजी त्याच्या घराची झडती घेतली असता तीन आरोपींना (Blackbuck Hunting) वन्य प्राण्यांच्या मांसाची वाटणी करताना रंगेहात पकडण्यात आले.
वाडेगाव येथील इंदिरा नगरमधील आरोपी सुनील रामेकर, विवेक वानखेडे, दीपक मोकडकर सर्व रा. इंदिरा नगर यांचे घरची झाडाझडती घेतली असता, सदरचे राहत्या घरात एक काळवीट शिकार करुन आरोपी दीपक मोकडकर यांचे घरी मांसाची हिसेवाटणी करत असताना आरोपीस रंगेहात पकडले. आरोपी जवळून वन्यप्राणी काळवीटचे मांस अंदाजे १.५ किलो. (Blackbuck Hunting) मांस कापण्याचे सुरा, विळा, एक जिवंत पोपट (पिंजर्यासह) व दोन मोबाइल जप्त करण्यात आले.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास सुरू आहे. २५ फेब्रुवारीला या आरोपींंना न्याय दंडाधिकारी बाळापूर यांच्यासमोर सादर केले असता २५ ते १ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहाय्यक वनरक्षक (भ.व) सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्ही.आर. थोरात यांचे अधिनस्त वनकर्मचारी वनपाल अनिता बेलसरे, सुभाष काटे, सोपान रेळे, अनिरुद्ध चौधरी, अर्जुन शेलार, अक्षय खंडारे, सागर पल्हाडे, रिजवान खान, तुषार आवारे आदी वनकर्मचार्यांनी केली.
वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा!
आजरोजी वाडेगाव येथे दोन माकड ( लाल तोंडचे बांदर) गावात हैदोस घालत आहेत. महिला, पुरुषांसह लहान बालकांच्या अंगावर येऊन चावा घ्यायचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त वनविभाग कधी करेल? वारंवार वन विभागाला (Blackbuck Hunting) फोन द्वारे माहिती देऊनही त्या दोन माकडांचा बंदोबस्त का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.