Pandharkawda crime news:- भाजी लवकर बनविली नसल्याने पत्नीला शिविगाळ (abuse) करुन तिच्यावर दिव्यासाठी आणुन ठेवलेले डिझेल टाकले. त्यानंतर पेटलेल्या दिव्याची वात तिच्या अंगावर टाकुन तिला पेटवुन दिले. जळुन गंभीर जख्मी झालेल्या पत्नीचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यु झाला होता. या प्रकरणाची न्यायालयात (Court) सुनवाई झाली असता, केळापुरचे सत्र न्यायाधिश अभिजित देशमुख यांनी दोषी पतीला जन्मठेपेची शिक्षा व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राहुल विशाल मरसकोल्हे २८ रा शिबला असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधम पतीचे नाव आहे.
सत्र न्यायाधीश अभिजित देशमुख यांचा निकाल
१८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान मृतक सौ आराधना हि घरी स्वयंपाक करीत होती. त्यावेळी आरोपी राहुल घरी आला व त्याने पत्नी आराधनाला भाजी झाली ना का म्हणुन विचारणा केली. भाजी लवकर का बनविली नाही. म्हणुन त्याने तिच्याशी वाद घालुन शिविगाळ करणे सुरु केले. हा वाद ईतका विकोपाला गेला कि राहुलने घरात दिवा लावण्याकरीता आणुन ठेवलेले डिझेल पत्नी आराधनाच्या अंगावर टाकले. तथा घरातील पेटता दिव्याची वात तिला लावुन जाळले. यामध्ये आराधना गंभीररित्या भाजल्या गेली होती. तिचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यु झाला. याबाबत आईने पाटण पोलीसात आरोपी विरुध्द तक्रार नोंदविली होती.
एपीआय संदिप पाटील यांनी आरोपी विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे (Crime) दाखल करुन तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी ९ महत्वाचे साक्षीदार तपासले. विद्यमान न्यायालयाने अभियोग पक्षाची बाजु ग्राह्य माणुन आरोपीस भादवीचे कलम ३०२ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये दंड,दंड न भरल्यास सहा महिने सश्रम करावासाची शिक्षा, कलम ४९८(अ)मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा सुध्दा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आरोपीच्या वतीने अॅड सिध्दार्थ लोढा यांनी बाजु मांडली होती. पैरवी अधिकारी म्हणुन अनिल कवाडे यांनी काम पाहिले.