– कृषी विभागाच्या कारवाईचे स्वागत
– शेतकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
परभणी (Bogus Fertilizer Stock) : पाथरी तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार व खात्रीशीर खत पुरवठा होणे गरजेचे असतानाच, सोमवारी परभणीच्या पाथरी शहरातील एका गोडाऊनमध्ये अनधिकृत व बोगस खतसाठा आढळून आला. तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकत संशयास्पद खत जप्त केले.
यावेळी खताचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल काही दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान हा खत साठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून फरार आरोपी सापडल्यानंतर (Bogus Fertilizer Stock) बोगस खत विक्रीची साखळी सापडण्याची शक्यता आहे. बोगस खते शेतकऱ्यांना विकणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली आहे .
सोमवार १६ जुन रोजी शहराशेजारील पोहेटाकळी शिवारामध्ये अवैधरित्या साठवणूक केलेला (Bogus Fertilizer Stock) बोगस खतांचा साठा तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या पथकाला आढळून आला होता . कारवाईनंतर कृषी विभागाने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बोगस खतांचे हे रॅकेट व्यापक असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर शेतकरी वर्गातून कृषी विभागाच्या तातडीच्या कारवाईचे स्वागत होत असून (Bogus Fertilizer Stock) बोगस खतांच्या विरोधात कठोर पावले उचलल्याशिवाय खरीप हंगाम सुरक्षित होणार नसल्याचे शेतकरी स्पष्टपणे सांगत आहेत. आजच्या घडीला लहरी हवामान, पेरणीसाठी होत असलेली धावपळ, खते व बियाण्यांचे वाढते दर, आणि आर्थिक ताणामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. अशावेळी बोगस खतांचा फटका बसल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादनच नाहीसे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बाजारात खुल्या विक्रीसाठी काही बोगस कंपन्यांची उत्पादने उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, या रॅकेटमध्ये खत विक्रीत साखळीचा सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करून सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे कॉ .दिपक लिपने , कॉ भागवत कोल्हे व शेतकरी लिंबाजी मिर्जे यांनी केली आहे.
तूर्तास अवैधरित्या खत साठवून केल्याप्रकरणी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेकडून नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. जर खत बोगस आढळून आले, तर हा शेतकऱ्यांच्या आरोग्याशी आणि अन्नसुरक्षेशी थेट संबंधित गुन्हा असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे .
कृषी विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान बोगस खते सापडले हे खरीप हंगामाच्या तोंडावर भयंकर आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यात ही फसवणूक .बँका शेतकऱ्यांना दारात उभे टाकू देत नाहीत. म्हणून खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन शेतकरी बियाणे खते खरेदी करत आहेत .अशी फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तालुका कृषी विभागाने केलेली कारवाई योग्य आहे त्याबद्दल त्यांचे स्वागत .यापुढे कृषी विभागाने दक्ष राहून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी पावले उचलावीत.
-कॉ . दिपक लिपणे, किसान सभा जिल्हा सेक्रेटरी
उघड्या आभाळाखाली शेती करणारा शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे त्यात पिकांना देण्यासाठी खरेदी केलेली खते जर (Bogus Fertilizer Stock) बोगस असतील तर उत्पादन कुठून येणार? शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकणाऱ्या बोगस खत अवैधरित्या साठवणूक करणारे व विक्री करणारी साखळी यांचा शोध घेत कठोर कारवाई करण्यात यावी .
-कॉ .भागवत कोल्हे
बोगस खत अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या विरोधात छापा टाकून गुन्हा दाखल केल्याबद्दल कृषी विभागाचे स्वागत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असताना शेतकऱ्यांच्या माथी बोगस खते मारून त्यांना आणखी संकटात टाकणाऱ्या आरोपीला पकडून शासन करावे.
-लिंबाजी मिर्जे, शेतकरी