दोन कार्यकर्ताचा आत्मदहनाचा प्रयत्न
अमरावती (Farmer Jalasamadhi Andolan) : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू (Bachu Kadu) हे गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराजांच्या महासमाधीलगत गेल्या तीन दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाला बसले आहे. मात्र तीन दिवसापासून सरकारने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते व शेतकरी संतप्त व आक्रमक झाले आहे. चांदूरबाजारच्या विश्रोली धरणावर (Farmer Jalasamadhi Andolan) जलसमाधी आंदोलन करत कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. विश्रोली धरणाच्या जल पात्रात उतरून कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या.
आठ जून पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ प्रहाराचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachu Kadu) हे उपोषला बसले आहेत. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, संपूर्ण सातबारा कोरा करणे. शेत मजूर कामगारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ स्थापन करणे, मनरेगाच्या मजुरीत वाढ करणे, सेंद्रिय खताला अनुदान देणे. या मागण्यासाठी बच्चू कडू (Bachu Kadu) उपोषणाला बसले आहे. या (Farmer Jalasamadhi Andolan) मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे यामुळे चांदूर बाजार तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे.