कळमनुरी (Kalmanuri Assembly Elections) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारी केली असून विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी कळमनुरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर (Kalmanuri Assembly Elections) कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी दि.१५ ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेतली यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथ येथील तहसीलदार हरिष गाडे, दत्ता नांदे,नायब तहसीलदार डॉ.सीमा कांदे,निवडणूक विभागाचे कर्मचारी शेख खालेक,संतोष खिल्लारे आदींच्या उपस्थिती होती. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख २९ हजार ३७५ मतदार असुन यात १लाख ५७ हजार ९७८ स्त्री मतदार आहेत तर १लाख ७१हजार ३९५ पुरुष मतदार असुन तृतीयपंथी २ मतदार आहेत. तर यावेळी युवा मतदारांची संख्या ८३४६ आहे यात ५०८५ पुरुष मतदार असून३२६१ स्त्री मतदार आहेत.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघा (Kalmanuri Assembly Elections) अंतर्गत एकूण ३४५ बुथ असून कळमनुरी तालुक्यात २०५ बुथ चा समावेश आहे तर औंढा नागनाथ येथे ८२ भागात ८२ बूथ असून हिंगोली मतदारसंघातील काही भाग कळमनुरी विधानसभा मतदारसंघात असल्याने यातील ५८ बूथ चा समावेश कळमनुरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आहे तसेच १५०० पेक्षा जास्त मतदान आहे असे ७ बुथ असुन यापैकी कळमनुरी शहरात ३बुथ आहेत तर आखाडा बाळापुर, औंढा नागनाथ शेनोडी व भटसावंगी येथे प्रत्येकी १बुथ आहे. तसेच निवडणूक काळात ४ स्थिर पथक व ४ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असुन स्थिर पथक हे उमरा फाटा,गौळ बाजार,चुंचा,हिवरा येथे कार्यरत असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.