देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Advocate Prashant Bhushan: देशात जन आंदोलनाची गरज; ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे मत…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Advocate Prashant Bhushan: देशात जन आंदोलनाची गरज; ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे मत…बघा VIDEO
नागपूरराजकारणविदर्भ

Advocate Prashant Bhushan: देशात जन आंदोलनाची गरज; ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे मत…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/25 at 7:27 PM
By Deshonnati Digital Published December 25, 2024
Share

देशोन्नती वृत्तसंकलन

नागपूर (Advocate Prashant Bhushan) : काही वर्षापूर्वी ‘लोकपाल’ बिलासाठी देशात फार मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. त्याच धर्तीवर सध्या देशातील प्रत्येकाला रोजगार, निःशुल्क शिक्षण, निःशुल्क आरोग्यसेवेचा अधिकार प्राप्त व्हावा, तसेच सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण थांबवण्यासाठी देशात मोठे आंदोलन करण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. रेल्वेस्टेशन मार्गावरील परवाना भवनात कॉ. एच. एल. परवाना स्मृतीनिमित्त मंगळवारी’ ‘भारतात आर्थिक लोकशाही कुठे आहे?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कॉ. एच. एल. परवाना स्मृती ट्रस्टचे ट्रस्टी सी. एम. व्यंकटचलम, डी. एन, बुचे, मोहन शर्मा, सुरेश बोभाटे, जे. एस गुरुवे, एस. एस. शर्मा, रामकुमार गुप्ता, आर. एम. नेरकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. आपण मतदान करतो. त्यातून आपला प्रतिनिधी निवडून देतो.

सारांश
देशोन्नती वृत्तसंकलनप्रकाश पोहरे यांचे कौतुक

त्यातून सरकार बनते. म्हणजे, राजकीय लोकशाही निर्माण झाली आहे. राजकीय लोकशाहीच्या तुलनेत भारतातील पन्नास टक्के नागरिक आर्थिक अधिकारापासून वंचित आहे. कोणत्या योजना राबवल्या पाहिजे, यासाठी लोकांचे मत विचारात घेतले जात नाही. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा मिळवणे, असे चक्र सुरू आहे. आर्थिक विषमता कमी करावी, हे सरकारचे दायित्व आहे. परंतु, त्यात सरकार कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या व्यक्तीने किती पैसा कमवावा, याला प्रतिबंध नाही. यामध्ये देशातील उद्योगपती मोठ्या संख्येने पैसा कमावत आहे. परंतु, त्यामानाने ते कर कमी देत आहेत. कार्पोरेट सेक्टरवर तर मोदी सरकार मेहरबान आहे. कर भरण्यात रिलायन्स कंपनीचा वाटा शून्य असल्याचा आरोपही ऍड. भूषण (Advocate Prashant Bhushan) यांनी केला. शिक्षणाचा अधिकार कायदा लागू झाला असला तरी त्याचा लाभ दलित, गरीब, झोडपट्टीमध्ये राहणारे, भटक्यांना झाला नाही.

अनेक ठिकाणी शासकीय शाळा नाहीत. जेथे शाळेच्या इमारती आहेत, तेथे शिक्षक नाहीत. शिक्षक आहेत तेथे चांगल्या सोयीसुविधा नाहीत. म्हणून सामान्य नागरिकही आपली मुले खासगी शाळेत शिकवायला पाठवत आहेत, असे सांगून ऍड. भूषण (Advocate Prashant Bhushan) म्हणाले, की देशातील एक टक्के नागरिकांना राहण्यासाठी घर नाही. एकट्या दिल्लीतच असे ३ लाख लोक असून ते सडकेवर झोपतात. अशा लोकांसाठी निवारागृहाची व्यवस्था केली पाहिजे. परंतु मोदी सरकारने निवारागृहाची योजनाच बंद करून टाकली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ऍड भूषण यांनी रोजगाराचा अधिकार, सरकारी कंपन्यांचे सुरु असलेले खासगीकरण, देशातील उद्योजकंकडून होत असलेली बँकांची लूट, शेअर मार्केटचे मॅन्युप्युलेशन, यावर प्रकाश टाकून प्रत्येकाला किमान गरजा पूर्ण होईल, असे धोरण राबवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. ऍड. भूषण (Advocate Prashant Bhushan) यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी विविध कामगार संघटना, बँक, वीमा क्षेत्रात काम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश पोहरे यांचे कौतुक

कोरोनाकाळात शासनातर्फे प्रत्येकाला जबरदस्तीने कोरोना प्रतिबंधित लस दिली जात होती. शासनाच्या या धोरणाला अवेकन इंडिया संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जात होती. यासाठी दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी आवाज उठवला होता. तसेच ठिकठिकाणी लस न घेण्यासाठी जनआंदोलन केले होते. लस घेतल्यास त्याच्या दुष्परिणामाचीही माहिती दिली जात होती. फार्मा कंपनीच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचाही आरोप पोहरे यांनी केला होता. न्यायालयाने संस्थेची ही याचिका स्वीकृत करून लस घेण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, असे आदेश दिले. पोहरे यांनी उभारलेल्या या आंदोलनाचे ऍड . प्रशांत भूषण यांनी कौतुक केले. तसेच पोहरे यांनी यावेळी शासनाने शाळकरी मुलांसाठी लागू केलेल्या ‘अपार’ आयडीच्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधले. यावेळी ऍड. भूषण (Advocate Prashant Bhushan) यांनी या मुद्द्याला आपण न्यायालयात आव्हान देऊ शकतो असे सांगितले.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: Advocate Prashant Bhushan, EVM, Prakash Pohare, Prakash Pohre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडाविदेश

India vs England 3rd test : भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना कुठे आणि किती वाजता खेळाला जाईल हे जाणून घ्या

Deshonnati Digital Deshonnati Digital July 7, 2025
Congress Mashal Morcha: 14 जूनला अमरावतीत जिल्हा काँग्रेसचा मशाल मोर्चा
Mumbai: सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलला संगीतकार विशाल ददलानी यांनी नोकरीचे आश्वासन दिले
Nashik: बारामतीला आता तीन खासदार व दोन आमदार
Isapur dam: ईसापूर धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?