अड्याळ (Adyal Cylinder Thief) : सिलिंडर चोरीचा अड्याळ पोलिसांनी पर्दाफाश करीत चार सिलिंडर चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोरीला गेलेल्या सिलिंडरसह चार आरोपींना अटक केली आहे.
अड्याळ येथील अमित बारापात्रे, कुलदीप उराडे व ऋषी कुंभारे यांनी भरलेले सिलिंडर घेण्यासाठी रिकामे सिलिंडर ठेवले असता एका मोटारसायकलवर सिलिंडर चोरून नेताना दिसून आले. त्याचा पाठलाग केला असता चोर पळून जाण्यास यशस्वी झाले. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी (Adyal Cylinder Thief) अड्याळ पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. चोरांच्या मुसक्या आवळणे हे एक आव्हान पोलिसांसमोर होते.
गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद रेवतकर (२५) रा.अड्याळ याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चोरी केल्याची कबुली देत इतर आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी छगन बारापात्रे (२९), गोपाल कुर्झेकर (३२), रोशन मुंडले (३१) सर्व रा. अड्याळ यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास दौलत मारबते करीत आहेत.