कोरची (Wild Boar Attack) : तालुक्यात मागील चार दिवसांत सहा तेंदू पत्ता मजूरावर (Wild Boar Attack) रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रानडुकरांमुळे तेंदू पत्ता मजूरावर दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
आज जखमी झालेल्या मध्ये कोरची इथून 15 किमी अंतरावर असलेल्या कोलूपदिकसा येथील दयाराम बुध्दू होळी वय 56 आणि हितकसा येथील दसरू सुखराम कचलामी यांचा समावेश आहे. (Wild Boar Attack) दोघांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेंदू पत्ता मजूरावर रानडुकर मागील 7 मे पासून हल्ला करून जखमी करीत आहेत. 7 मे ला बेतकाठी येथील नंदकुमारी तेजराम बघवा 40 हे जखमी झाले. त्याच दिवशी बिहीटेकला येथील उर्मिला संतोष मिरी 48 ह्या जखमी झाले. 8 मे ला बेतकाठी येथील निराशा रवींद्र गुरवले 30 ह्या जखमी झाल्या. 9 मे ला भिमपूर येथील चंद्रप्रकाश गुलाब यादव 36 हे जखमी झाले होते. आणि आज पुन्हा दोन व्यक्ती जखमी झाले. या सर्वांना आधी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून डॉ. राहुल राऊत यांनी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
ग्रामसभा आणि तेंदूपत्ता ठेकेदार यांच्यात झालेल्या करारानुसार तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या (Wild Boar Attack) मजूराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला दिड लाख रुपये आणि जखमी झालेल्या मजूरांना पन्नास हजार रुपये औषधोपचार करण्यासाठी देण्याचा करार झाला असताना आज पर्यंत एकाही जखमींना तेंदूपत्ता ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. वन विभागाकडून सुध्दा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली नाही. तेव्हा ठेकेदार आणि वन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आहे.




 
			

