विभागीय आयुक्तांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
समस्या न सुटल्यास १६ जूनपासून आमरण उपोषण
समस्या न सुटल्यास १६ जूनपासून आमरण उपोषण
अमरावती (Prahar Teachers Association) : अमरावती विभागातील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना (Prahar Teachers Association) चांगलीच आक्रमक झाली असून विभागीय आयुक्तांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. पंधरा दिवसात समस्या मार्गी न लागल्यास शिक्षकांच्या न्याय हक्कास्तव १६ जून पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे व आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे वतीने राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी निवेदनातून दिला आहे.
अमरावती विभागातील कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत (Prahar Teachers Association) प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त श्वेता सींघल यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.अमरावती विभागातील अमरावती सह अकोला ,बुलढाणा, वाशीम, यवतमाळ पाचही जिल्ह्यातील जि.प. अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनु. शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या वजा मागण्या निवेदनातून सादर करण्यात आल्या आहेत.
या आहेत प्रमुख मागण्या…
ज्यामध्ये, ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा 15 मार्च 2024 चा अन्यायकारक संचमान्यता शासन आदेश तत्काळ रद्द करण्याबाबत च्या प्रमुख मागणीसह अमरावती विभागातील जिल्हा परिषद मधील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या बिंदूंनामावली (रोस्टर) तात्काळ अदयावत करून रिक्त पद व अतिरिक्त पदांचा अहवाल संघटनेला (Prahar Teachers Association) उपलब्ध करून दयावा. जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत मेळघाट मध्ये इसांतर्गत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून तत्काळ शिक्षक भरती करून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील संवर्ग १ मधील दिव्यांग व इतर मुद्द्यांची विशेष समिती गठीत करून जे. जे.रुग्णालय, मुंबई कडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक वेतन वाढ लागू करावी. दुर्गम मधील शिक्षकांच्या रोटेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
आंतर जिल्हा बदली सन. २०२४-२५ करिता बदली पोर्टल सुरु करण्याबाबत, पेसा क्षेत्रातील रिक्त पदे तत्काळ स्थानिक अनु. जमाती पात्र उमेदवारांमधून भरण्यात यावे,प्रोत्साहन भत्ता व चटई क्षेत्र अतिरिक्त घरभाडे भत्ता तात्काळ लागू करण्याबाबत, उर्दू माध्यम बिंदूनमावलीतील आरक्षित पदे परावर्तीत करण्याबाबत,२००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्धीने नियुक्त झालेल्या शिक्षक (Prahar Teachers Association) व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा. अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची प्रलंबीत असलेली शिष्यवृत्ती रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
विषय शिक्षक वेतनश्रेणी बाबत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील विषय (Prahar Teachers Association) शिक्षकांना सरसकट ४३००/- ग्रेड पे तात्काळ लागू करावी, विद्यार्थ्यांचा गणवेश निधी शाळा सुरु होण्यापूर्वी शालेय खात्यावर जमा करण्याबाबत,या व्यतिरिक्त सामान्य भविष्य निर्वाह निधी, शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके व वेतन बाबत तत्काळ कारवाई, विद्यार्थी आधार कार्ड बाबत, प्रलंबित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव निकाली काढण्याबाबत, सेवानिवृत्त शिक्षक समस्या, शिक्षकांच्या डीसिपीएस बाबत कार्यवाही, वेतन विलंबाबत, सेवा पुस्तक अद्यावत बाबत , अमरावती विभागातील पदोन्नती बाबत, केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी विभागीय परीक्षा इत्यादी एकूण २८ समस्या वजा मागण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषद निहाय काही विशिष्ट मागण्या देखील यादी निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आहे.
या सर्व मागण्या बाबत विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये लवकरच विभागीय स्तरावर स्वतंत्र बैठकीचे (Prahar Teachers Association) आयोजन करून समस्या निराकरण करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल मॅडम यांनी दिले आहे. ही बैठक माजी आमदार बच्चू कडू यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये होईल.मात्र १५ जुन रोजी पर्यंत बैठकीचे आयोजन करून समस्या मार्गी न लागल्यास दि. १६ जून पासून संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांच्या उपस्थिती मध्ये लक्षवेधी बेमुदत धरणे व आमरण उपोषण करण्यात येईल.
– महेश ठाकरे ,राज्याध्यक्ष,प्रहार शिक्षक संघटना.
यावेळी राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह (Prahar Teachers Association) प्रहार शिक्षक संघटना अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश टीकार, अमरावती जिल्हा अध्यक्ष शरद काळे, अमरावती जिल्हा सचिव अमोल वऱ्हेकर, कार्याध्यक्ष नागसेन रामटेके, उपाध्यक्ष दिलीप इंगळे,तुकाराम सांगळे, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष किरण वानखडे, अचलपूर तालुका अध्यक्ष रमेश कडू,कोषाध्यक्ष अमोल पंडित, अकोला सहसचिव हेमंत कुमार बोरोकार, नंदकिशोर धर्मे,शरद सदाफळे, इमरान अहेमद अ.हमीद, दानिश इकबाल, अजिमोद्दीन शारिक, शजुबेर शाह मोहसीन शाह यांचेसह मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.