परभणी (Agriculture Department) : तालुक्यातील पेडगाव येथील माऊली (Agriculture Centre) कृषी केंद्रावर बनावट खत विक्री होत असल्याचे कळाल्यावर लातूर येथील विभागीय गुण नियंत्रक प्रवीण भोर यांनी सोमवार २७ मे रोजी अचानक छापेमारी करत त्या कृषी केंद्राची तपासणी केली. त्यात त्यांना बनावट खताची एक बॅग आढळून आली. सदरील तपासणीत त्या कृषी केंद्र चालकांनी (Agriculture Department) कृषी अधिकार्यांना स्वतःहून कबुली दिली की, मी (fake fertilizer) बनावट खत तयार करण्याचा धंदा गत तीन वर्षापासून चालवत आहे. जिल्ह्यातील अधिकार्याने बनावट खताचा गोरखधंदा उघड करून शेतकर्यांना सतर्क केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट खत (fake fertilizer) बनवण्याच्या धंदा चालू असतानाही परभणी कृषी विभागाने (Agriculture Department) याकडे झोपेचे सोंग घेत दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तीन वर्षापासून चालू होती बनावटगिरी
याप्रकरणी खत निरीक्षक प्रदीप कदम यांच्या फिर्यादीनंतर २९ मे रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात परळीतील दोघांचा समावेश आहे. यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता परळीपर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र इतक्या मोठ्या कारवाईत एकच बॅग बनावट असल्याचे निदर्शनास आले. मात्र अशा किती बोगस बॅग आतापर्यंत शेतकर्यांच्या माथी मारल्या गेल्या. हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सदरील प्रकरणाची पाळे- मुळे कुठपर्यंत रुजली गेली आहेत ? याचा तरी छडा आता (Agriculture Department) परभणी कृषी विभागाने लावावा, असे सर्वसामान्य शेतकर्यांकडून बोलले जात आहे.
असे तयार केले जात होते बनावट खत…
शेतीतील सर्वात स्वस्त खत असलेल्या सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार) या खताच्या बॅग ह्या सर्वात महाग असलेले खत १०;२६;२६ व डीएपी या खतांच्या रिकाम्या बॅगेत दाणेदार या खताची बॅग पलटी केली जात होती. जेणेकरून सदरील खताची बॅग ही खरी डीएपी व १०;२६;२६ सच आहे. असे खरेदी करताना शेतकर्यांना वाटायचे. तसेच सदरील डीएपी व १०;२६;२६ या बॅगेवर ते खर्या बॅग सारखे हुबेहूप प्रिंटिंग करून आणायचे. असे विभागीय गुण नियंत्रण प्रवीण भोर यांनी सांगितले.
पेडगावातून तक्रारी आल्यानंतर केली कारवाई
पेडगावातील कृषी दुकानावर बनावट खत (fake fertilizer) तयार केले जात असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी स्वतः सदरील दुकानावर लातूर वरून येत छापा टाकला.त्यात मला खताची एक बॅग बनावट असल्याची खात्री झाली. संबंधिताला आणखीन बॅग किती व कुठे आहेत याची विचारणा केली असता त्याने (fake fertilizer) बनावट बॅगची विक्री केल्याची सांगितले आहे. ते शेतकर्यांना पक्के बिल न देता त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधिताने सदरील प्रकार हा तीन वर्षापासून करीत असल्याचे कबूली जबाबही दिला आहे.
– प्रवीण भोर, विभागीय गुण नियंत्रक,लातूर.