पोलीस स्थानकात हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक!
आखाडा बाळापूर (Akhada Police) : पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना सतर्क राहून कार्य करण्याच्या व आप आपल्या हद्दीतील घडामोडींच्या तात्काळ बिटप्रमुख (Bit Head) व पोलीस स्थानकात माहिती देण्याच्या सुचना शनिवारी देण्यात आली. शनिवारी पोलीस स्थानकात हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली.
ग्रामीण भागात (Rural Areas) गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असलेल्या, पोलीस पाटील (Police Patil) यांना पोलिसांच्या वतीने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे. गावोगावच्या पोलीस पाटलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावात वाडी वस्तीवर पेट्रोलिंग करणे, गावात नवीन, संशयित नवीन व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्याला (Police Station) कळवणे, दररोज गावात महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरे, शाळा, कॉलेज, बँका, पतसंस्था इत्यादीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने (Police Administration) सांगितले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके (Sub-Inspector of Police Ganesh Gotke) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी पवार, अतुल मस्के, शेख अनसार, दिगबंर शिंदे, गजानन मोरे, मिलिंद थोरात, प्रताप ढोकणे, रमेश धांडे, ज्ञानेश्वर मस्के, स्वप्नील गांजरे, वैजनाथ चांदीवाले,रूस्तुम हाके, अशोक गिरे, अनिल वाघमारे, वैभव जांबूतकर, यादव कुंभकर्ण, दत्तराव पतंगे, पोर्णिमा देशमुख, उज्वला आठवले, कल्याण खोकले, शारदा खोकले, नर्मदा खरबे, चंद्रमुनी खिलारे, लक्ष्मण माहोरे, मुकेश गाडेकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन डीसबीचे अतुल मस्के यांनी केले.