अखिल भारतीय मराठा महासंग्राम व अखिल भारतीय छावा संघटनेचा इशारा!
लातूर (Akhil Bhartiy Chhava Sanghatan) : लातूरच्या जुना रेणापूर नाका येथील चैतन्य ई-टेक्नो स्कूलला कसल्याही प्रकारची मान्यता नसताना शाळा बंद करून सील (School Seal) न केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.3) अखिल भारतीय मराठा महासंग्राम (All India Maratha Great War) व अखिल भारतीय छावा संघटनेने चैतन्य ई टेक्नो स्कूलसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. बोगस व अनधिकृत शाळा (Bogus And Unauthorized Schools) शोध मोहिमेच्या नावाखाली लातूरच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्यासह उपशिक्षणाधिकारी बुऱ्हान हाशमी, उपशिक्षणाधिकारी क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा शोध मोहिमेत या शाळेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही तात्काळ कारवाईची मागणी मराठा महासंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी पाटील आणि छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली आहे.
शाळेला शिक्षण विभाग टाळे ठोकणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच..
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळा बंद करण्यासाठी वेळ मिळत नाही. इतकेच नाहीतर शिक्षण विभागात (Department of Education) चालू असलेल्या चर्चेनुसार शिक्षण विभागातील अधिकारी चैतन्य ई टेक्नो स्कूलच्या संबंधित व्यक्तींशी संपर्क करतात व हे अधिकारी (Officer) येण्याअगोदर तेथील सर्व मुलांना एका कुठल्यातरी रूममध्ये बंद करतात व इथे फक्त प्री-प्रायमरी स्कूल चालू आहे, असा अहवाल देतात. इथे आम्ही शाळा चालवत नाहीत, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून पत्र लिहून घेतात, असा आरोप संघटनांनी निवेदनात केला आहे. जोपर्यंत शाळेला शिक्षण विभाग टाळे ठोकणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, आता इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनासोबत 30 जून 2025 रोजी काढलेले फोटो व केलेली व्हिडिओ शूटिंग संघटनांनी (Organizations) दिली आहे. निवेदनाच्या प्रती सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.