शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळण्याचे संकेत
काटेपूर्णा धरण प्रकल्पात 91.29 टक्के जलसाठा
बार्शीटाकळी (Akola water) : बार्शीटाकळी तालुक्यातील महान चे काटेपूर्णा धरण प्रकल्पात 91. 29% असल्याने अकोला महानगरपालिकेतील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे काटेपूर्णाधरण (Akola water) प्रकल्प बार्शीटाकळी तालुक्यातील महानला आहे. दिनांक 28 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सदर धरण प्रकल्पात 91.29% जलसाठा जमा झालेला धरणाच्या वरच्या बाजूला पाऊस चालू असल्याने धरण 100% भरण्याची शक्यता निर्माण झाली असून धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणाच्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर धरण लवकरच 100% भरत असल्याने (Akola water) अकोला महानगरपालिकेतील जनतेला चालू वर्षात भरपूर पाणी मिळू शकते. तसेच खांबोरा येथून निर्माण झालेल्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला रब्बी हंगामात पाणी मिळण्याची शक्यता सूत्रांनी कडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील जनतेलाव शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार असल्याने जनतेला दिलासा मिळत आहे.