पातूर (Akola) :- दि. 29 मार्च 2025 रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) साहेब यांच्या संकल्पनेतून युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई, शिवसेना (Shiv Sena) उपनेते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या आदेशाने युवासेना विभागीय सचिव सागर देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात परीक्षेचे आयोजन…
तसेच युवासेना विस्तारक अजय घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तळकर, शिवसेना शहरप्रमुख निरंजन बंड, शिवसेना उपशहर प्रमुख सचिन गिऱ्हे, शिवसेना उपशहर प्रमुख विशाल तेजवाल, योगेश लांडगे, राहुल गवई, प्रतीक पाटील, आकाश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना मॉक टेस्ट शनिवार रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सिन्हा महाविद्यालयामध्ये घेण्यात आली. यावेळी डॉ.एच. एन.सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण खंडारे, प्रा. डॉ. रोनिल आहाळे यांनी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच प्रा.जयेंद्र बोरकर सर,योगेंद्र बोरकर सर,प्रा.शंकर गाडगे सर,प्रकाश सोनोने सर, प्रा.मिलिंद वाकोडे, अमानकर सर यांनी परीक्षेची मोठी जबाबदारी उत्तमरित्या स्वीकारली तसेच मोलाचे सहकार्य केले. या मॉक टेस्ट परीक्षेमध्ये (Mock Test Exam) पातूर तालुक्यातील 400 विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.व सदर परीक्षा ही शांततेत पार पडली.