Akoli :- संत्रा घेऊन जाणार्या ट्रकने रस्त्यावर उभ्या ट्रकला जबर धडक दिली. त्यात चालकाचा मृत्यू (Death)झाला तर सहकारी जखमी झाला. हा अपघात वर्धा – आर्वी मार्गावर येळाकेळी शिवारात शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडला.
उभ्या ट्रकला धडक संत्रा घेऊन जाणार्या ट्रकची धडक
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा – आर्वी मार्गावर येळाकेळी येथे वर्ध्याच्या दिशेने जाणारा टीएस १८ टी ३३४५ क्रमांकाचा ट्रक उभा होता. दरम्यान, पहाटेच्या सुमारास संत्रा भरून चांदूर (बाजार) कडून हैद्राबादकडे जात असलेल्या टी. एस. ०८ यू. एम. १२६७ क्रमांकाच्या ट्रकने उभ्या ट्रकला मागाहून धडक दिली. त्यात ट्रकचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. अपघातात ट्रकचालक मनिष बृहस्पती यादव (वय २०) रा. ग्रामबारी, मध्यप्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला. क्लिनर रवी यादव रा. चिकारा, मध्यप्रदेश हा जखमी झाला. जखमीस स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी सावंगी (मेघे) तसेच महामार्ग पोलिस मदत केंद्र जाम पोलिसांनी भेट दिली. अपघात निदर्शनास येताच स्थानिकांनी मदत कार्य केले. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसांनी नोंद केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे