जि. प. प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान!
बार्शी टाकळी (Alanda Gram Mandal) : आळंदा ग्राम मंडळाने (Alanda Gram Mandal) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या कुटुंबातील पालकांचा पाणी व घर कर माफ करण्याचा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. असे मत गटविकास अधिकारी रविकांत पवार (Group Development Officer Ravikant Pawar) यांनी व्यक्त केले.
पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान!
23 जून हा 2025 शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस, असल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम मंडळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा च्या संयुक्त विद्यमाने, इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा (Students Honor Ceremony) आयोजित केला होता. यावेळी बार्शीटाकळी पंचायत समितीचे (Barshitakali Panchayat Samiti) गटविकास अधिकारी रविकांत पवार, श्रीमती रत्नमाला खडके, आळंदा ग्राम मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील ढोरे, उपाध्यक्ष विश्वनाथ जानोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ चैतालीताई बेद्रे, उपाध्यक्ष सौ शिल्पाताई मोहोड, पोलीस पाटीलसुनील खाडे, हनुमान व्यायाम शाळेचे वस्ताद बंडूभाऊ पाटील, रमेश नागे, संजय भाऊ घटाळे, धनराज लोंदे, सचिन मोहोड असे अनेक जण उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला!
सर्वप्रथम इयत्ता पहिली वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे वाजत गाजत शाळेच्या प्रवेश दाराजवळ विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे कुमकुम तिलक करण्यात आले आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील हे पहिले पाऊल असल्यामुळे आयुष्यभरासाठी त्यांच्या जीवनामध्ये अविस्मरणीय राहावा. अशा प्रसंगासाठी त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर सन्माननीय पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व ग्राम मंडळांनी एकजुटीने शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांचा पाणी व घर तर माफ केल्याने दत्ता ढोरे वग्राम मंडळातील सदस्यांचा मान्यवरांनी सन्मान केला. यानंतर विद्यार्थ्यांना मिस्टिन्नाचे वाटप करूनविद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, टाय बेल्ट ,पाटी, नोटबुक, पेन, पेन्सिल, शूज, सॉक्स अशा विविध वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्राथमिकशाळेतील जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये, एनएमएमएस परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त करतील, अशा विद्यार्थ्यांसाठी पाच पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकगण, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामविकास अधिकारी उंबरकर यांचे सह अनेक जण यावेळी उपस्थित होते.