ना. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य डिजिटल क्रांतीचे जागतिक नेतृत्व करण्यास सज्ज
मानोरा (Indo-Pacific Conference) : वाशीम जिल्हा मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र ग्राम कोंडोली येथील निवासी आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांनी राज्याची राजधानी मुंबई येथे नुकताच आयोजित (Indo-Pacific Conference) इंडो पॅसिफिक परिषदेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आपला सहभाग नोंदविला.
इंडो पॅसिफिक परिषद (Indo-Pacific Conference) अमेरिकेचे होम डिपार्टमेंट, वर्ल्ड लर्निंग आणि डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जगातील ११५ पेक्षा अधिक देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. सर्वांनी एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड आणि वर्चुअल रियालिटी, ब्लॉकचेन व बौद्धिक संपदा हक्क यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने क्रियाशील उद्योगात होणारे परिवर्तन यावर सखोल मंथन केले.
राज्याचे प्रतिनिधित्व करताना पाटणकर यांनी एकीकडे विकासाच्या स्पर्धेत माघारलेला महाराष्ट्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या निर्णयक दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे विकासाच्या आघाडीवर पुढे जात आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्टार्टअप्स, डिजिटल गव्हर्नन्स आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयामुळे महाराष्ट्र आता राष्ट्रीय व (Indo-Pacific Conference) आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवे मापदंड प्रस्थापित करीत आहे. क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज हे आता केवळ कला व अभिव्यक्ती पुरते मर्यादित राहिले नसून आर्थिक प्रगती, सामाजिक व सांस्कृतिक सामर्थ्य याचा केंद्रबिंदू बनत आहे.
महाराष्ट्रात याला चालना देण्यासाठी सर्वतोपरी धोरणे आखली जात आहेत. (Indo-Pacific Conference) इंडो पॅसिफिक क्षेत्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर महाराष्ट्र आता डिजिटल क्रांतीचे नेतृत्व ना. फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन या परिषदेत पाटणकर यांनी व्यक्त केले.