लाखोंची उलाढाल मंदावली कास्तकारांपुढे जनावरे विक्रीचा प्रश्न!
रिसोड (Animal Traders) : दिनांक 17 जुलै रोजी गुरुवारी गुरांच्या बाजारामध्ये (Cattle Market) कुरेशी समाज व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांमुळे (Farmers) आर्थिक संकट ओढावले आहे. रिसोडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातच गुरांच्या बाजारातून व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. आपल्या दैनंदिन गरजा शेतीसाठी व अन्य कामांसाठी कास्तकार आपली जनावरे विक्रीसाठी रिसोड बाजारामध्ये (Risode Market) आणत आहेत. मात्र गुरांच्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आल्यापाई आपली जनावरे नेण्याचे काम पडले, तर बाजारामध्ये फक्त म्हशी दिसून आल्या. ह्या मागचे कारण असे की गुरांच्या बाजारामध्ये खरेदी व विक्री करण्यासाठी बहुतांश व्यापारी हे कुरेशी समाजाचे असतात.
बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर संघटना कडून, वाहने अडवून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप करत, ती वाहने पोलिसांच्या स्वाधीन!
गेली काही वर्षापासून व्यापारी द्वारा कास्तकाराकडून खरेदी केलेली, जनावरे विविध वाहनातून वाहतूक करत असताना रस्त्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर संघटना कडून ती वाहने अडवून सदर जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप करत, ती वाहने पोलिसांच्या (Police) स्वाधीन करणे व यातून होणारे छोटे-मोठे वाद-विवाद व मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असल्याने यावर कुठेतरी निर्बंध यावा यासाठी व्यापाऱ्यांनी सदर खरेदी विक्री (Buy Sell) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर खरेदी विक्री ही केव्हा पर्यंत बंद राहणार याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही. रिसोड गुरांच्या बाजारामध्ये दर गुरुवारी लाखो रुपयांची उलाढाल होते. कास्तकार हे आपली जनावरे घेऊन बाजारामध्ये येतात ज्यामध्ये बैल, म्हशी, गोरा, वासरू ही जनावरे मोठ्या प्रमाणे कास्तकार आणत असतात. मात्र व्यापाऱ्यांनी सदर खरेदी बंद केली असल्याने शेतकऱ्यांपुढे आपली जनावरे विकण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता ही जनावरे आम्ही कोठे विकावी? या जनावरांचा काय करावं? असा प्रश्न आता कास्तकारंकडून विचारला जात आहे. गुरुवारी दिनांक 17 जुलै रोजी रिसोड येथील गुरांच्या बाजारामध्ये अक्षरशा सन्नाटा दिसून आला.
विनाकारण पोलिसात नेऊन गुन्हे दाखल करणे, या बाबी सातत्याने वाढत आहे!
बजरंग दल विश्व हिंदू परिषद या संघटना कडून रस्त्यावर जनावरांची वाहतूक होत असतांना त्यांची वाहने अडवणे, विनाकारण त्रास देणे पोलिसात नेऊन गुन्हे दाखल करणे या बाबी सातत्याने वाढत असल्याकारणाने यावर कुठेतरी निर्बंध यावे यासाठी सदर खरेदी विक्री बंद केली आहे.
इरफान कुरेशी, व्यापारी रिसोड
रस्त्यावर जनावरांची वाहतूक करत असताना व्यापाऱ्यांना गेली अनेक वर्षापासून बजरंग दल व विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याकारणाने व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी बंद केली आहे. यामुळे आम्हा शेतकऱ्यांसमोर आता जनावरे विक्रीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दैनंदिन गरजा व शेती कामासाठी आम्ही जनावरे विकत असतो मात्र आता आम्ही याचा काय करावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
शेतकरी रिसोड




