अवैध कृती केल्यास यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश!
नांदेड (Animal Trafficking) : घोरपडीची तस्करी करणाऱ्यास नांदेड ग्रामीण पोलिसांनी (Nanded Rural Police) 9 जून रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन घोरपडी जप्त केल्या आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंदे, अवैध कृती यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 9 जून रोजी नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर यांना 9 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एक इसम घोरपड या प्राण्याची तस्करी (Animal Trafficking) करुन विक्री करण्यासाठी जवळ बाळगून आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी वर नमुद पोलीस अंमलदारयांना चंदासिंग कॉर्नर येथे पाठवून छापा कारवाई (Raid Action) केली असता, तेथे दशरथ यलपा धोतरे (27) हा इसम पिशवी घेवून मिळून आला. त्या इसमाजवळील पिशवीची पाहणी करता, त्यात एक घोरपड अंदाजे 5 किलो वजनाची व एक घोरपड 3 किलो वजनाची असे तस्करी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला. पकडलेल्या घोरपडी बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड (Forest Range Officer Nanded) यांना पुढील कारवाई करण्याचे पत्रक देवुन गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची प्रकिया सुरु आहे. पकडण्यात आलेल्या घोरपडी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडे देण्यात आल्या आहेत.