Ajit Pawar Birth Anniversary

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गोजुबावी येथे पवार कुटुंबीयांकडून आदरांजली

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गोजुबावी येथे पवार कुटुंबीयांकडून आदरांजली

विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळापासून गोजुबावी धावपट्टीपर्यंत श्रद्धांजली; सोशल मीडियावरील सुनेत्रा पवार यांच्या भावनिक पोस्टची चर्चा

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळ तसेच गोजुबावी येथील दुर्घटनास्थळी जाऊन अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरात अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले.

जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्या पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील आणि विजया पाटील यांच्यासह बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावातील त्या धावपट्टीवर पोहोचल्या, जिथे अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता.

कुटुंबीयांनी दुर्घटनास्थळी पुष्प अर्पण करून अजित पवारांना आदरांजली वाहिली. या वेळी सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणींनी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याने उपस्थितांमध्येही हळवे वातावरण निर्माण झाले.

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना २८ जानेवारी रोजी हा भीषण विमान अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळालगतच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत त्यांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले. अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेनंतर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत झालेल्या चौकशीत अशा प्रकारच्या संशयाला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

दरम्यान, जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही शेअर केली. "दादा... एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र आज त्याच दिवसाला 'जयंती' म्हणून स्वीकारताना मन तुटून जात आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझा सर्वात मोठा आधार होता. तुमच्या आठवणी, विचार, लोकसेवेची भावना, शिस्त आणि प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या पवित्र स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन केले.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026