Annual General Meeting

बालाजी अर्बनची 33वी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न

बालाजी अर्बन पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिखली येथे उत्साहात संपन्न झाली. संस्थेने 170 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून सुरक्षित कर्जवाटपावर भर देणार आहे.

बालाजी अर्बनची 33वी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न

Annual General Meeting

170 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार; सुरक्षित कर्जवाटपावर भर देणार – नारायणराव खरात

चिखली : चिखली शहरातील प्रतिष्ठित व आयएसओ मानांकित बालाजी अर्बन पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 13 सप्टेंबर रोजी परमहंस मौनीबाबा संस्थानच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आमसभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायणराव गणपतराव खरात होते.

या आमसभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले साहेब, दि. चिखली अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त, अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजय कोठारी, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे संचालक अंकुशराव पडघान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, माजी उपनगराध्यक्ष श्रीराम झोरे, युवा सेना प्रमुख नंदुभाऊ कऱ्हाडे यांच्यासह संस्थेचे कार्यकारी संचालक गोपाल शेटे, संचालक ॲड. मंगेश व्यवहारे, नारायण भवर, प्रताप खरात, आनंद जाधव, जुलालसिंग परिहार, सौ. पुष्पाताई राजपूत, सौ. संध्याताई सावजी, तज्ञ संचालक ॲड. अर्पित मिनासे, सी.ए. मनीष गुरुदासानी, तांत्रिक सल्लागार शार्दूल व्यवहारे, सुदर्शन खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेची सुरुवात भगवान बालाजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. आमसभेचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी संचालक गोपाल शेटे यांनी केले. यावेळी त्यांनी संस्था स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आलेख उपस्थित सभासदांसमोर मांडला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष नारायणराव खरात यांनी सभासद व ठेवीदारांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने 170 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षापासून सुरक्षित कर्जवाटपावर अधिक भर देण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सभासदांना अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्था कायमच आग्रही असून, मोबाईल ॲप, क्यूआर कोड यांसारख्या आधुनिक सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. सभासदांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमसभेचे सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात सभासदांना माहिती दिली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध ठरावांचे वाचन करण्यात आले.

सालाबादप्रमाणे संस्थेच्या उत्कृष्ट कर्जदार व खातेदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्य शाखेचे कर्जदार गजानन शेळके, जुनेगाव शाखेचे कर्जदार रवि शांताराम खरात, राऊतवाडी शाखेचे कर्जदार मोहसिन बागवान, तसेच उत्कृष्ट खातेदार लक्ष्मण भराड व सुनिल गादे यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, आर्थिक वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेच्या देऊळगाव राजा शाखेने प्रथम क्रमांक, तर पुंडलीक नगर शाखेने द्वितीय क्रमांक पटकावला. देऊळगाव राजा शाखेचे पालक संचालक ॲड. अर्पित मिनासे, शाखा व्यवस्थापक विश्वजितसिंह ठाकूर व शाखा कर्मचारी यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. तर पुंडलीक नगर शाखेचे पालक संचालक जुलालसिंग परिहार, शाखा व्यवस्थापक भगवान चिंचोले व कर्मचारी वृंदांनी पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरव्यवस्थापक अशोक नाईक, ज्येष्ठ कर्मचारी रमेश देशमुख तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जुनेगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक सुनिल शिंदे यांनी केले. स्नेहभोजनाने आमसभेची सांगता झाली.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

Chikhli Farmers' Crop Loan: खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा

Sep 30, 2026