सोलापुरात धाडसी चोरी; एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ

 सोलापूर शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली असून चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोलापुरात धाडसी चोरी; एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ

ATM Theft

सोलापूर (ATM Theft) : सोलापूर शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली असून चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरकुल परिसरातील सग्गम नगर भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या एटीएम केंद्रावर ही घटना घडली. ही चोरी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएममधील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न न करता संपूर्ण मशीनच उखडून वाहनात टाकले आणि तेथून पसार झाले. या घटनेवरून चोरट्यांनी आधीच रेकी करून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांत सोलापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.

एटीएमसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणालाच लक्ष्य केल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच एसबीआयचे वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात नाकेबंदी केली असून तपास सुरू केला आहे.

सदर एटीएम केंद्रात सुरक्षेसाठी आत दोन आणि बाहेर एक असे एकूण तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. पोलिसांनी या कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. बँक प्रशासनाकडून कॅश ऑडिट सुरू असून त्यानंतरच चोरीची अचूक रक्कम समोर येणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026