सकल मराठा समाज

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj

 

हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंदचे आवाहन; जिल्हाधिकारी गुप्ता यांना निवेदन

हिंगोली (Sakal Maratha Samaj) : संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रकृतीची काळजी घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.या मागणीसाठी सकल मराठा समाज हिंगोली तालुक्याच्या वतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी हिंगोली शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर बंद पूर्णपणे शांततामय व अहिंसक पद्धतीने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेतली जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे. शुक्रवारी शहर व तालुका बंदसाठी आवश्यक परवानगी देऊन सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. (Sakal Maratha Samaj) मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासुन आमरण उपोषण करीत आहेत. त्याच्या या लढ्याला पाठींबा देण्यासाठी त्यांच्या तब्येतीची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी सखल समाच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासनाने गांर्भीयाने पाहुन सकारात्मक निर्णय घ्यावा.

राज्यातील कायद्या व सुव्यवस्था अबाधीत राहावी अशा भावना यावेळी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत. सदर बंद हा पुर्णपणे शांतता व अहिसंक पध्दतीने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काळजी घेतली जाणार आहे. अशी विनंती निवेदनाद्वारे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासुन संघर्ष योध्दा मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी अग्रही झाले असून सकल मराठा समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.

मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती देखिल त्यांनी केली आहे. त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला हिंगोली जिल्ह्यासह इतर ही जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून आता अनेक गावात बंद पुकारला जात आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून सकल मराठा समाज बांधवानी शांततेच्या मार्गाने बंदचे आवाहन केल्याने त्यांना सर्वत्र पाठींबा मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये गुरूवारी अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. तर शुक्रवारी देखिल हिंगोली शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात येणार आहे.

टैग्स: Sakal Maratha Samaj

संबंधित सामग्री

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही

Sep 08, 2026
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल

Sep 07, 2026
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Sep 04, 2026
सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले.

Sep 03, 2026