सकल मराठा समाज

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj

कुरूंदा (Sakal Maratha Samaj) : मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि त्यांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी  वसमत तालुक्यातील कौठा पॉईंटवर ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दुपारी १ ते ३ या वेळेत झालेल्या या आंदोलनात वसमत शहर व ग्रामीण भागातील (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाज बांधव, महिला भगिनी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख मागण्या मध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे.मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचा अहवाल तात्काळ लागू करावा. आदी मागण्यांचा समावेश आहे . यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, मनोज दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पुढील  आंदोलन सुरूच राहील असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

या (Sakal Maratha Samaj) रास्ता रोकोमुळे वसमत - हिंगोली महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी वसमत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी  सकल मराठा समाज  शहरातील  व ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: Sakal Maratha Samaj

संबंधित सामग्री

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही

Sep 08, 2026
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल

Sep 07, 2026
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज

Sep 03, 2026
सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले.

Sep 03, 2026