भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.

भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

Bhalgav Development

भालगाव (Bhalgav Development) : चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून गावाला स्वतःची सार्वजनिक विवाह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात आतापर्यंत शाळेच्या प्रांगणातच सर्व कार्यक्रम पार पडत होते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच सौ. मीना संतोष परीहार, उपसरपंच व सदस्यांनी अतिक्रमित व अस्वच्छ सार्वजनिक जागा मोकळी करून तिचा विकास केला. या कामासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामधून कंपाऊंड वॉल, प्रवेशद्वार व स्टेज उभारण्यात आले.

या नव्या जागेवर २६ एप्रिल २०२६ रोजी पहिला विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले पाटील यांची उपस्थिती लाभली.

‘हागणदारी’ ते ‘तोरणादारी’

कधी काळी उपेक्षित आणि अस्वच्छ असलेली ही जागा ग्रामस्थांच्या एकजुटीने पूर्णतः बदलली. महिलांच्या सहभागातून व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून ही भूमी आता धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्यांचे केंद्र बनली आहे. अलीकडेच येथे सावित्रीमाता सप्ताहही मोठ्या उत्साहात पार पडला.

डोमची मागणी

दरम्यान, या ठिकाणी पावसाळ्यात कार्यक्रम घेता यावेत यासाठी टिनशेड डोम (छत) उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच मीना परीहार यांनी आमदारांकडे केली आहे. “हे काम पूर्ण झाल्यास गावाला वर्षभर सामूहिक कार्यक्रमांसाठी मोठी सुविधा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

गावकऱ्यांच्या मते, हा बदल केवळ विकासाचा नाही तर एकतेचा आणि नव्या आशेचा जिवंत पुरावा ठरला आहे.

संबंधित सामग्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Sep 07, 2026
हिंगोलीत उद्या 'मिशन ऊर्जा' अभियानाचा समारोप, 10 हजार विद्यार्थ्यांची रॅली 

हिंगोलीत उद्या 'मिशन ऊर्जा' अभियानाचा समारोप, 10 हजार विद्यार्थ्यांची रॅली 

Mission Urja Abhiyan: हिंगोलीत ‘मिशन ऊर्जा’ अभियान समाप्त करण्यासाठी 11 ऑगस्ट, 2026 रोजी एक जनजागृती रॅली आयोजित झाले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन पालक मंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते

Aug 10, 2026
हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

Hingoli Municipal Council: शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती

Aug 10, 2026
हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

Harshvardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे तीव्र पडसाद

Aug 05, 2026
कन्हान येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

कन्हान येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

कन्हान येथे महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

Aug 01, 2026