Bharat Vibhushan Samman 2026

डॉ. सतिष विडोळकर यांचा गौरव; भारत विभूषण सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

‘भारत विभूषण सन्मान २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने पंजाब विधानसभेत सन्मानित करण्यात आल्याबद्दल हिंगोली येथे सत्कार करण्यात आला.

डॉ. सतिष विडोळकर यांचा गौरव; भारत विभूषण सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

Bharat Vibhushan Samman 2026

हिंगोली (Bharat Vibhushan Samman 2026) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सतिष नरहरराव विडोळकर यांना ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने पंजाब विधानसभेत सन्मानित करण्यात आल्याबद्दल हिंगोली येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

मध्यंतरी चंदीगड येथील पंजाब विधानसभेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. सतिष विडोळकर यांना ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याच पार्श्वभूमीवर संगीतरत्न अनुराधाताई नांदेडकर, शैलेश नांदेडकर आणि सौ. श्वेता नांदेडकर यांनी डॉ. विडोळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ. विडोळकर यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील सन्मानामुळे हिंगोली जिल्ह्यासह नर्सी नामदेव परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026