भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या हिंगोली जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची निवड करण्यात आली.

भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची निवड

BJP Hingoli

हिंगोली (BJP Hingoli) : भारतीय जनता पक्षाच्या हिंगोली जिल्हा प्रवक्तेपदी विलास गोरे यांची निवड करण्यात आली. राज्याच्या पक्ष सचिव तथा हिंगोली जिल्हा प्रभारी रेखाताई कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. विलास गोरे यांनी माजी आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये असताना प्रवक्ते म्हणून दीर्घकाळ काम पाहिले असून, त्यांच्या दांडग्या अनुभवाची आणि भाजपमधील सक्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविली आहे.जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र रेखाताई कुलकर्णी यांनी गोरे यांना सुपूर्द केले. यावेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विलास गोरे यांच्या या निवडीबद्दल खासदार रामराव वडकुते, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी आमदार प्रज्ञाताई सातव,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,सुभाषचंद्र लदनिया, माजी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, संजय कावडे, रवी पाटील गोरेगावकर, बाबा घुगे, संजय ढोके, रजनीश पुरोहित,श्रिरंग राठोड,मनोज शर्मा,संजय खंडेलवाल, पवन उपाध्याय, कैलास शहाणे,लखन कुरिल,अमित रुहाटिया,महेश शहाणे,राहुल मेने,प्रतिक अग्रवाल,आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026