हिंगोली ग्रामीण पोलिसात महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल
हिंगोली (Live in relationship) : शहराजवळील बळसोंड रामाकृष्णा सिटीमधील एका ४५ वर्षीय भाजपच्या माजी पदाधिकार्याला लिव्ह इन रिलेशनशिपमधील एका महिलेने २० लाख रुपये व पाच तोळे सोने घेवून अतिरिक्त पैशाच्या मागणीसाठी अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिसात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहराजवळील बळसोंड रामाकृष्णा सिटीमधील आशिष वाजपेयी यांनी मागील काही वर्षापुर्वी युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणार्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगार लोकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय महिलेला समन्वय करून नेमले होते. हे काम करीत असताना आशिष वाजपेयी यांची महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप झाली असताना या जवळीकतेचा फायदा घेवून सदर महिलेने वाजपेयी यांच्याकडे पैशााची मागणी केली असल्याने तिला यापुर्वी २० लाख रुपये पाच तोळे सोने तसेच १० लाखाचे तीन धनादेश दिले होते.
परंतु सदर महिलेकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होते. याच पैशासाठी १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास सदर महिलेने बळसोंड रामाकृष्णा सिटी भागात वाजपेयी यांच्या घरासमोर आली होती. वारंवार महिलेकडून पैशाची मागणी होत असल्याने आशिष वाजपेयी यांनी पैसे देण्याकरीता नकार दर्शविल्याने सदर महिले समाजात बदनामी करून अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला जाईल तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने १७ एप्रिलला हिंगोली ग्रामीण पोलिसात आशिष वाजपेयी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.