Bribery Case

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; चिपळूणचा मंडळ अधिकारी ACBच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यात फेरफार करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यावर रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; चिपळूणचा मंडळ अधिकारी ACBच्या जाळ्यात

Bribery Case

उमेश राजेशिर्के याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले; महसूल विभागात खळबळ

चिपळूण : सातबारा उताऱ्यात फेरफार करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यावर रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. उमेश राजेशिर्के असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, तक्रारदाराकडून रोख रक्कम स्वीकारताना ACBच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम महसूल विभागाकडे प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACBच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राजेशिर्के याच्यावर कारवाई करण्यासाठी सापळा रचण्यात आला.

ठरलेल्या नियोजनानुसार तक्रारदाराच्या कारमध्ये मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के आला. त्याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर चिपळूण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या शासकीय कामांच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

Hingoli ACB Squad Action: पेट्रोल पंपासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले..

Oct 02, 2026
FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीत रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

Sep 30, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026