CA Final Result

जिद्द, मैत्री आणि परिश्रमाचा सुवर्ण संगम; आयुष व मधुर यांचे सीए फायनलमध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश

चिखलीतील आयुष देशमुख आणि मधुर भांगडिया यांनी सीए फायनल परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत शहराचा गौरव वाढविला.<br/>

जिद्द, मैत्री आणि परिश्रमाचा सुवर्ण संगम; आयुष व मधुर यांचे सीए फायनलमध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश

CA Final Result

चिखलीच्या दोन जिवलग मित्रांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मिळविले उल्लेखनीय यश; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

चिखली (CA Final Result) : चिखली येथील दोन जिवलग वर्गमित्र आयुष अनिता सदाशिव देशमुख आणि मधुर सुषमा शैलेश भांगडिया यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन करून चिखली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, दृढ इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर दोघांनीही हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण शहराचा गौरव वाढविला आहे.

विशेष म्हणजे, आयुषने मराठी माध्यमाच्या शाळेत तर मधुरने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. दहावीपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतरही त्यांच्या मैत्रीचा धागा कायम राहिला. दहावीनंतर दोघांनी अकोला येथे एकत्रितपणे सीए फाउंडेशन व इंटरचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर पुणे येथे पुढील सीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन अथक परिश्रमाच्या जोरावर दोघांनीही सीए फायनल परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

या यशामुळे दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने चिखली शहराच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

Chikhli Farmers' Crop Loan: खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा

Sep 30, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026