पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी; जिजाई बंगल्यावरील बैठकीनंतर अखेर शिक्कामोर्तब

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सोमवारी दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता.

पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी; जिजाई बंगल्यावरील बैठकीनंतर अखेर शिक्कामोर्तब

Candidate Finalization

पुणे (Candidate Finalization) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सोमवारी दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर अनेक तास चाललेल्या बैठका, अंतर्गत चर्चा आणि नाराज नेत्यांची समजूत काढल्यानंतर माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील जिजाई बंगल्यावर सोमवारी सकाळपासून महत्त्वाच्या बैठकींचे सत्र सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्यात उमेदवारीबाबत चर्चा सुरू होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत विक्रम काकडे यांच्या नावाला तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचे मानले जात होते. मात्र, पक्षातील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवल्याने उमेदवारीचा तिढा कायम होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी भूमिका पक्षातील एका गटाने घेतली होती. त्यामुळे नव्याने पक्षात येणाऱ्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दुसरीकडे, वडगाव-शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत होते. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी जिजाई बंगल्यावर झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, संजय काकडे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पक्षातील नाराज गटाची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, इच्छुक उमेदवार सुनील टिंगरे हे बैठकीनंतर जिजाई बंगल्यातून बाहेर पडले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. “मी पक्ष कार्यालयात पुढील तयारीसाठी जात आहे,” एवढेच सांगून ते निघून गेले. त्यानंतर विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले.

विक्रम काकडे यांची माहिती

पुण्यातील उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे हे व्यवसाय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. बांधकाम क्षेत्रात उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या विक्रम काकडे यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून, राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे मानले जाते.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026