Cash Theft

हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; कारची काच फोडून १० लाख रुपये चोरणारी आंध्रप्रदेशातील टोळी गजाआड

वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी बँकेतून काढलेले १० लाख रुपये कारची काच फोडून चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ११ दिवसांत छडा लावला.

हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; कारची काच फोडून १० लाख रुपये चोरणारी आंध्रप्रदेशातील टोळी गजाआड

Cash Theft

११ दिवसांत गुन्ह्याचा छडा; दोन सराईत आरोपी अटकेत, ५ लाख रुपये रोख जप्त

हिंगोली (Cash Theft) : वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी बँकेतून काढलेले १० लाख रुपये कारची काच फोडून चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ११ दिवसांत छडा लावला. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीतील ५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी दुपारी २.४५ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान वसमत शहरातील आसेगाव कॉर्नर येथील युनियन बँकेसमोर ही घटना घडली. फिर्यादी प्रशांत विलासराव डाखोरे, रा. पळसगाव, ता. वसमत यांनी वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी बँकेतून १० लाख रुपये काढले होते. त्यांनी ही रक्कम MH-13 BN-8755 क्रमांकाच्या कारमध्ये ठेवून बाहेर येताच अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून पैशांनी भरलेली बॅग लंपास केली.

या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाला वेग दिला.

तपासादरम्यान प्रदीप राजु पेटला आणि मधु जवळा भास्कर, दोघेही रा. तिपा, बिटरगुंट्टा, जि. नेल्लोर (आंध्रप्रदेश) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने थेट आंध्रप्रदेशात जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीतील ५ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले असून उर्वरित रकमेचा तसेच इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार भुजंग कोंकरे, शिवाजी जालमीरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, मुनिर मुन्नीवाले, शंकर हराळ, दत्ता नागरे आणि प्रदीप झुंगरे यांचा सहभाग होता.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026